पक्षांची तृष्णा भागविण्यासाठी निसर्ग मित्र समिती, माऊली फाऊंडेशनचा पुढाकार 

सुधाकर पाटील
गुरुवार, 3 मे 2018

उष्णतेच्या तीव्रतेमुळे पक्षांची परीस्थिती अवघड बनली आहे. त्यांना अशा परीस्थितीत पाणी उपलब्ध करून देणे आपले दायीत्व आहे.  पक्षाची टंचाई दुर करण्यासाठी आम्ही झांडावरही भांडे ठेवणार आहोत.  इतरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. सकाळ' ने योग्य विषयाला हात घातला
- विनोद बोरसे उपसरपंच तथा उपाध्यक्ष निसर्ग मित्र समिती भडगाव

भडगाव : पक्षांच्या टंचाई चे काय ? या मथळ्याखाली आज  ' सकाळ ' ने वृत्त प्रसिद्ध करून  पक्षाच्या टंचाईची वस्तुस्थिती समोर आणली होती. या वृत्ताची दखल घेत निसर्ग मित्र समिती व माऊली फाऊंडेशन पक्षांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. तर 'सकाळ' ने पक्षांच्या प्रति जागल्याची भुमिका घेतल्याबद्दल वृक्षप्रेमींसह अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. 

उन्हाळा लागला म्हणजे टंचाईचे नियोजन सुरू होते. मात्र माणसांच्या टंचाई नियोजनात पक्षांच्या टंचाईकडे कोणीच गांभिर्याने घेतांना दिसत नाही. सद्य:स्थितीला उष्णतेचा पारा पंचेचाळीसीवर पोहचला आहे. त्यामुळे पक्ष्याची चिवचिवाट बंद झाली आहे. पाण्याअभावी पक्षी सैरभैर झाले आहे. नदि, तलाव, धरण आटल्याने त्यांचे जलस्त्रोतही आटल्याने पक्षी कासावीस झाल्याचे चित्र आहे.  'सकाळ' ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताचे पक्षीप्रेमींसह अनेकांनी 'सकाळ'च्या जागल्याच्या भुमिकेचे कौतुक केले. 

निसर्गमित्र समिती घेणार पुढाकार
'
सकाळ' च्या पक्षांच्या टंचाई वृत्ताची दखल घेत निसर्ग मित्र समिती पक्षाच्या टंचाईसाठि पुढाकार घेणार आहे. निसर्ग मित्र समितीच्या भडगाव शाखेच्या वतीने पिचर्डे परीसरात लवकरच  पक्षांसाठी  पाण्याचे भांडे ठेवण्यात येणार असल्याचे समितीचे तालुकाध्यक्ष धनराज पाटील यांनी सांगीतले. त्या भांड्यामधे समितीचे कार्यकर्ते दररोज पाणी टाकणार आहेत. सध्या उष्णतेने कहर केला आहे. मे महीन्यात हा तडाखा वाढण्याची स्थिती आहे. त्यामुळे पक्षांवर आपण भुतदया दाखविणे  आवश्यक असल्याचे धनराज पाटील यांनी सांगीतले.  तर पक्षांची टंचाई दुर करण्यासाठी  नागरीकांनि पुढाकार घेण्यासाठी  निसर्ग मित्र समितीच्या वतीने जनजागृती करणार असल्याचे संस्थापक प्रेमकुमार अहीरे यांनी 'सकाळ ' शी बोलतांना सांगितले.

माऊली फाऊंडेशन पाण्याबरोबर अन्नाची करणार सोय
भडगाव येथील सतत सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले माऊली फाऊंडेशन उष्णतेत पक्षांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. 'सकाळ' मधे प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत ते हा उपक्रम हाती घेणार आहेत. पक्षांसाठी नुसते पाणीच नव्हे तर अन्नही ठेवणार असल्याचे माऊली फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी शहरात पारोळा रस्त्यावर पाणपोई लावण्यात येत. त्यामुळे आता पक्षांनाही पाण्याची  व अन्नाची उपलब्धतता करण्याचा माऊली फाऊंडेशनचा भर आहे.  

माऊली फाऊंडेशनचे सदस्य भुवया म्हणून  घरी पक्षांसाठी पाणी व अन्नाचे भांडे ठेवण्याचा प्रयत्न करतोच . पण त्याबरोबर सामुहिकरित्या झांडावरही हे पाणी व अन्न ठेवणार आहोत. ' सकाळ 'ने योग्य विषयाला वाचा फोडली.
- योगेश शिंपी कार्यकर्ता माऊली फाऊंडेशन भडगाव 

उष्णतेच्या तीव्रतेमुळे पक्षांची परीस्थिती अवघड बनली आहे. त्यांना अशा परीस्थितीत पाणी उपलब्ध करून देणे आपले दायीत्व आहे.  पक्षाची टंचाई दुर करण्यासाठी आम्ही झांडावरही भांडे ठेवणार आहोत.  इतरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. सकाळ' ने योग्य विषयाला हात घातला
- विनोद बोरसे उपसरपंच तथा उपाध्यक्ष निसर्ग मित्र समिती भडगाव

Web Title: water for birds in sudhagad