तब्बल पंचवीस हजार येवलेकर भागवताय टँकरवर तहान

yeola
yeola

येवला - आत्ताच जीवाची लाही-लाही करणारं ऊन पडू लागल्याने थोडय़ाफार प्रमाणात पाणी असणारे जलस्रोतही कोरडेठाक झाले आहे. यामुळे गावोगावची पाणीटंचाई वाढीस लागली असून आजमितीस सुमारे २३ ते २५ हजार येवलेकरांची तहान टँकरवर भागवली जात आहे. यासाठी पंधरा टँकर रोज धावताय.

मार्चपासून तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला असून दमदार पाऊस न झाल्याने भर पावसाळ्यातही टँकर सुरू होते. यामुळे सात महिने झाले पण टँकर बंद झालेले नाहीत. संख्या कमी करण्यासाठी काही ठिकाणचे टँकर प्रशासनाने बंद केले होते. मात्र या ठिकाणाहून पुन्हा मागणी होऊ लागली आहे. पाण्याअभावी अनेक गावांच्या योजनाही माना टाकत असून नागरिकांना आत्ताच थेंबभर पाण्यासाठी वाड्यावस्त्यांवर भटकंतीची वेळ येत आहे. कुठे योजनाचे गावात पिण्यासाठी पाणी आहे मात्र वस्त्या कोरड्या झाल्याने खास वस्त्यांसाठी टँकर सुरू आहेत. मागील मार्चनतर टँकरचा सिलसिला सुरु झाला असून संख्या वाढतीच आहे.

गाव, वाड्या, वस्त्या मिळून बेचाळीस गावातील सुमारे पंचवीस हजारांपर्यंत नागरिक टँकरच्या पाण्यावर विसंबून आहेत. आता तर पाणी आटल्याने नव्याने कोळम खुर्द व बुद्रुक, लहित, आडसुरेगाव, धामणगाव, आहेरवाडी व सायगाव येथील चार वाडय़ांचे प्रस्ताव शासन दरबारी दाखल झाले आहेत. ही संख्या वाढती असून यंदा टँकरग्रस्त गावाचा विक्रम होण्याची शक्यता आहे.

आकडे बोलतात...
-एकूण टँकर १५  
-शासकीय टँकर - ८
-खाजगी टँकर - ७
-मानसी पाणी - २० लिटर
-गावे - ३३
-वाड्या - १९
-रोजच्या खेपा - ४४
-टँकरग्रस्त गावांची लोकसंख्या : ३९,९३८
-टंचाईग्रस्त गावेवस्त्या -५२
-पाण्याचा उद्भव - नांदूर व दूध विहीर
-पहिला टँकर मंजुरी - १२ मार्च १८

“पाणीटंचाई गंभीर असल्याने पंचायत समितीकडे आलेले प्रस्ताव तातडीने पुढे पाठविले जातात. नव्याने चार ठिकाणचे प्रस्ताव प्राप्त आहेत तर आडसुरेगाव, धामणगाव व आहेरवाडी येथील प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठवले आहेत.”
- सजन घूनवट, पाणीटंचाई विभाग प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com