गिरणा नदीला पूर येणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नाशिक : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने धरणात पाण्याचा फ्लो वाढत आहे. आज (ता.२६) सकाळी साडेपाच वाजता १० हजार, तर अकरा वाजता २० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. 

नाशिक : गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने धरणात पाण्याचा फ्लो वाढत आहे. आज (ता.२६) सकाळी साडेपाच वाजता १० हजार, तर अकरा वाजता २० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे गिरणा नदीला मोठा पुर येण्याची शक्यता आहे. 

२० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

गिरणा धरण ओव्हरफ्लो झाले. तेव्हापासुन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सुरवातीला 1500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता. दोन दिवसपूर्वी साडेसात हजार क्युसेकने विसर्ग सुरू झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा विसर्ग अडीच हजारवर आला होता.

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्या

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात आवक मोठ्याप्रणात वाढत आहे. आज सकाळी दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर नऊ वाजता पुन्हा अडीच हजाराने विसर्ग वाढविण्यात आला. तर पुन्हा अर्धा तासाने अडीच हजाराने विसर्ग वाढून 15 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग गेला. त्यानंतरही धरणात पाण्याचा फ्लो वाढल्याने अकरा वाजता धरणातून एकूण 20 हजार क्युसेसने सुरू करण्यात आल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी दिली.

धरणाचे सहा दरवाजे २-३ फुटाने उघडले

धरणाचे एकूण सहा दरवाजे २-३ फुटाने उघडविण्यात आले आहे. सन २००६ नंतर पहिल्यांदाच गिरणेला एवढ्या मोठ्याप्रणात पाणी वाहत आहे. गिरणेला मोठा पूर येणार आहे. त्यामुळे काठावरच्या गावकर्यानी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे चे उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water erosion by 20,000 cusecs of girna dam