पाणी चोरी रोखणे पाटबंधारे विभागासमोर आव्हान

दीपक कच्छवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

कृष्णापुरी धरण हे कोरडेठाक झाले होते.या धरणात गिरणा चे पाणी टाकावे यासाठी 'सकाळ' ने हा प्रश्न लावुन धरला होता.या वृत्ताची दखल घेऊन या धरणात गिरणाचे पाणी टाकण्यात आले.त्यामुळे या भागातील तांडा वस्तीवरील गुरांचा पाण्याचा प्रश्न देखील सुटला.त्यामुळे येथील शेतकर्यामध्ये  आनंद व्यक्त होत आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कृष्णापुरी धरणात 'गिरणा'चे' पाणी टाकल्याने शेतकऱयांसह ग्रामस्थामध्ये आनंद व्यक्त होत आहे. या धरणातुन होणारी  पाण्याची  चोरी रोखण्याचे मात्र पाटबंधारे विभागासमोर आव्हान राहणार आहे.

कृष्णापुरी धरण हे कोरडेठाक झाले होते.या धरणात गिरणा चे पाणी टाकावे यासाठी 'सकाळ' ने हा प्रश्न लावुन धरला होता.या वृत्ताची दखल घेऊन या धरणात गिरणाचे पाणी टाकण्यात आले.त्यामुळे या भागातील तांडा वस्तीवरील गुरांचा पाण्याचा प्रश्न देखील सुटला.त्यामुळे येथील शेतकर्यामध्ये  आनंद व्यक्त होत आहे.

कृष्णापुरी धरणात सध्या स्थितीत पंधरा ते वीस टक्के पाणीसाठा आहे.मागील वर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता.या पावसाळ्यात  धरण केवळ 18 टक्के भरले होते.या पाणीसाठ्याचे देखील   धरणातून मोठ्या प्रमाणावर चोरून अवैध पाणीउपसा करत होते.नुकतेच टाकण्यात आलेल्या  पाणीसाठ्याचा योग्य रितीने वापर केला तर निश्चितच एप्रिल व मे मध्ये पाणीटंचाई जाणवणार नाही.सहज  उन्हाळा पास होईल. त्यासाठी पाटबंधारे विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे. धरणावर मोठ्या प्रमाणावर पाण्याची होत असते.ही चोरी रोखण्याचे आता जणूकाही पाटबंधारे विभागाला मोठे आव्हानच ठरणार आहे.

कृष्णापुरी तांडा परिसरात निर्माण झालेली पाण्याची समस्या सुटल्याने ग्रामस्थांसह, महिला व शेतकर्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत आहे. या भागातील गुरांचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला होता.आता गुरांचाही पाण्याचा प्रश्न सुटल्याने पशुपालकामध्ये  समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: water issue in Krushnapuri dam