मनमाडची पाणीटंचाईतून कायमची मुक्तता करण्यासाठी मोदींना साकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

मी आज सेवानिवृत्त आहे. माझ्या वडिलांनी आणि माझी अख्खी हयात येथे गेली पण अद्यापही मनमाडचा पाणीप्रश्न सुटलेला नाही अजून किती दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. नागरिकांनी पाण्यासाठी जनरेटा तयार करणे गरजेचे आहे. पाणीप्रश्न सुटण्याचे एकही मार्ग दिसत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. 
- अनिल निरभवणे, कामगार नेते

मनमाड : मनमाड शहराची पाणीटंचाईतुन कायमची मुक्तता करावी यासाठी कामगार नेते अनिल निरभवणे, सामाजिक कार्यकर्ते संजय कटारे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालत पंतप्रधान कार्यालयात ईमेलद्वारे निवेदन पाठवून पाण्याची कैफियत मांडली आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थेपोटी प्रत्येक निवडणुकीत अश्वाशीत केला जाणारा पाणीप्रश्न आता पंतप्रधान सोडवतील या आशेने थेट पंतप्रधानांपर्यंत पोहचला आहे.

भर उन्हाळ्यात मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरण कोरडेठाक पडल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. कुठेच पाणी शिल्लक नसल्याने हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना कामे धंदे सोडून वणवण भटकावे लागत आहे. अवर्तनाचे पाणी येण्यास उशीर असल्याने मोठे संकटाचे दिवस मनमाडकरांवर येऊन कोसळले आहे, त्यामुळे सव्वालाख लोकसंख्या असलेल्या मनमाड शहराला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मनमाडवर ओढवणारी पाणीटंचाई निर्माण होण्यासाठी ज्याप्रमाणे राजकारणी जबाबदार आहे. त्याप्रमाणे येथील नागरिकही तितकेच जबाबदार आहे प्रत्येक निवडणुक होऊ द्या त्या निवडणुकीत मनमाडचा पाणीप्रश्न नाही असे होणार नाही. निवडणूक आली की पाणीप्रश्न सभेतून सोडविण्याचे मोठं मोठी आश्वासने दिली जातात आर्मस्ट्रॉंग म्हणविल्या जाणाऱ्या भुजबळांची सिंहगर्जना सर्वांनाच ठाऊक आहे. मनमाडचा पाणीप्रश्न सोडविला नाही तर मी भुजबळ नाव लावणार नाही त्यामुळे अद्यापही हा प्रश्न भिजत घोंगड्या सारखा पडला आहे सध्याची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे, की शहरात पाणीच नाही त्यामुळे मनमाडचा पाणीप्रश्न थेट पंतप्रधानापर्यंत मांडण्यात आला आहे. राजकीय उदानसीता दिसत असल्याने कामगार नेते अनिल निरभवणे, सामाजिक कार्यकर्ते संजय कटारे आणि प्रसिद्ध वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे सर यांनी थेट पंतप्रधान कार्यालयात ईमेलद्वारे निवेदन सादर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मनमाडच्या पाणीटंचाईची कैफियत मांडली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की आता बस किती दिवस मनमाडकरांना इथले राजकारणी दिशाभूल करतील प्रत्येक निवडणूक आली की मनमाडचा पाणीप्रश्न सोडवून द्या मते पाणी अनु निवडणूक संपली की दिलेले आश्वासनही विरून जाते. पुन्हा पाणीप्रश्न जैसेथे असतो पाऊस कमी झाल्याने धरणात पाणी येऊ शकले नाही. अवर्तनाचे पाणी पुरत नाही नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागते येणारी मोलमजुरी पाण्यात निघून जाते. त्यामुळे कमवायचे काय आणि खायचे काय असा बाका प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे गेल्या ४० वर्षांपासून मनमाड पाणीटंचाईच्या खाईत खितपत आहे. कोणीच वर काढायला तयार नाही राजकीय नेते तयार असतात मात्र प्रबळ राजकिय इच्छा शक्ती नसल्याने हा प्रश्न पूढे जात नाही जनरेटाही दिसत नाही. त्यामुळे अजून किती दिवस मनमाडच्या नागरिकांना या पाणी संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. मनमाडचे नागरिकही स्वतंत्र भारतात राहतात त्यांना कधी मुबलक पाणी वापरायला मिळेल अशी आशा व्यक्त करत या सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की आता पाणीप्रश्न सुटेल अशी कोणतीच आशा दिसत नाही. करंजवन पाणी योजना मनमाडला तारणारी योजना दिसत असतांनाही शासन दरबारी विभागांच्या फायलीमध्ये अडकली आहे त्यामुळे आपण देशाचे सर्वोच्च स्थानी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आपणच मनमाडच्या पाणीप्रश्नावर लक्ष घालून मनमाडकरांना न्याय देण्याची मागणी केली आहे त्यामुळे मनमाडचा पाणीप्रश्न थेट पंतप्रधानांपर्यंत पोहचला आहे. 

मी आज सेवानिवृत्त आहे. माझ्या वडिलांनी आणि माझी अख्खी हयात येथे गेली पण अद्यापही मनमाडचा पाणीप्रश्न सुटलेला नाही अजून किती दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. नागरिकांनी पाण्यासाठी जनरेटा तयार करणे गरजेचे आहे. पाणीप्रश्न सुटण्याचे एकही मार्ग दिसत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. 
- अनिल निरभवणे, कामगार नेते

निवडणूक आली की मनमाडचा पाणीप्रश्न सुटेल केवळ आश्वासनांचा पाऊस पडतो ठोस उपाययोजना होतांना दिसत नाही पाणी टंचाईच्या झळा अजून किती दिवस सोसायच्या त्यामुळे पाण्याचे गाऱ्हाणे थेट पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे मांडले आहे.
- संजय कटारे, सामाजिक कार्यकर्ते

मनमाडमध्ये भीषण पाणीटंचाई आहे पाणी नाही, त्यामुळे विकास नाही. परिणामी नागरिक शहर सोडून इतरत्र स्थलांतर करत आहे. असेच होत राहिले तर एक दिवस शहर भकास होईल शहरातील नागरिकांमध्ये ठासून गुणवत्ता भरली आहे पण पाणी नसल्याने गुणवत्तेला आणि विकासाला चालना मिळत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणीटंचाईतुन मुक्त करावे यासाठी निवेदनाद्वारे कैफियत मांडली आहे. - प्रवीण व्यवहारे, प्रसिद्ध वेटलिफ्टिंग प्रशिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water problem in Manmad