ऐन उन्हाळ्यात मनमाडवर भीषण पाणीटंचाईचे संकट

manmad
manmad

मनमाड : ऐन उन्हाळ्यात मनमाड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत असल्याने पाणी पुरेल की नाही याची शाश्वती नाही. पुरेसे पाणी नसल्याने महिन्यातून एकदा पाणी पुरवठा होत असून पाण्यासाठी शोधाशोध कायम आहे.  

वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे धरण भरू शकले नाही. परिणामी पावसाळ्यातच शहरावर पाणी टंचाईचे संकट ओढवले होते. आता ऐन उन्हाळ्यात मनमाडकरांच्या घशाला कोरड पडली आहे. पालखेड धरणाचे घेतलेले आवर्तन १५ ते २० दिवसाआड शहराला पाणी पुरवठा करून आतापर्यंत पुरविले मात्र भर उन्हाळ्यात आता वागदर्डी धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. मे शेवटपर्यंत हे पाणी पुरेल की नाही याची शाश्वती नाही. ऐन उन्हाळ्यात पुन्हा शहरावर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सर्व मदार आता पालखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर आहे. मागे मिळालेल्या आवर्तनाच्या पाण्यातून पालिकेने शहरात २० दिवसाआड पाणी पुरवठा केला.

मात्र आता तर धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. आहे पालखेड अवर्तनाचे पाणी सोडल्यामुळे इतक्या दिवस पाणी पुरले सध्या शहराला महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र धरणातील पाणी आता संपुष्टात येत असून धरणाने तळ गाठायला सुरवात केली आहे. धरणातील अवर्तनाचे पाणी संपले तर ऐन उन्हाळ्यात शहरावर भीषण पाणी संकट उभे राहणार आहे. त्यामुळे मनमाडकर चिंतेत सापडला असून पाणी आणावे तरी कुठून असा प्रश्न नागरिकांना सतावीत आहे पाटोदा येथील साठवण तलावही कोरडाठाक पडला आहे.

गेल्या तीन चार वर्षापासून पाहिजे तेव्हडा पाऊस पडला नसल्याने भूगर्भातील भूजल पातळी खालावली शहरातील बोअरवेल, हातपंप, विहिरींही कोरड्याठाक झाल्या आहे त्यामुळे शहराला अधिक पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे पालिकेतर्फे महिन्यातून एकदा केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असले तरी वापरण्यासाठी पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे तर विकत पाणी घेऊन गरज भागवावी लागत आहे शहरातील विविध जलकुंभावर असलेल्या नळांवर पाणी भरण्यासाठी महिलांची रांग लागलेली दिसते त्यामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार शहरावर कायम आहे. 

पालखेड धरणात हक्काचे मुबलक पाणी आरक्षित असताना देखील केवळ वेळेवर पाणी न देणे, जे दिले तेही कमी पाणी देणे, मोठ्या प्रमाणात होणारी पाणी चोरी, संबंधित विभागाचा मनमानी कारभार व दुजाभावापणामुळे मनमाडच्या सव्वालाख नागरिकांना नेहमीच पाणीबाणीचा सामना करावा लागतो यंदा तर वागदर्डी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस झाला नसल्याने धरणात पावसाचे पाणी आले नाही त्यामुळे सर्व मदार पालखेड धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर आहे पालिकेला अवर्तनाचे पाणी जपून वापरावे लागते त्यामुळे मागे मिळालेल्या आवर्तनाच्या पाण्यातून पालिकेने शहराला २० दिवसआड पाणी पुरवठा करत पाणी पुरविले मात्र  धरणातील पाणीसाठा संपत आल्याने शहरात भीषण पाणीबाणी निर्माण झाली आहे.

वाघदर्डी धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे २५ मे पर्यंतच जेमतेम पुरेल १५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे पाणीटंचाई असून पालखेडच्या पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ. दिलीप मनेकर, मुख्याधिकारी, मनमाड नगर पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com