Water Problem News : मनपाच्या हलगर्जीमुळे पाणीटंचाई; शिवसेनेचा आरोप

water problem
water problemesakal

Dhule News : शहरासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध असताना केवळ महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीमुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे शिवसेनेला (ठाकरे गट) आंदोलन करावे लागत आहे, असे सांगत आंदोलकांनी हंडाधारी महिलांसह महापालिकेत मंगळवारी (ता. २३) दुपारी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच पोतराजाने महापालिका आवारात आसूड ओढून घेत आंदोलनात सहभाग नोंदविला. (Water shortage due to independence of municipality Allegations on Shiv Sena Stand Dhule News)

पोलिसांच्या मध्यस्थीने मोजक्याच महिला आंदोलकांकडून आयुक्त देवीदास टेकाळे यांनी निवेदन स्वीकारले. भविष्यात पाणीप्रश्‍न न सुटल्यास जनताच सत्ताधाऱ्यांवर आसूड उगारेल, असा इशारा आंदोलकांनी पोतराजाच्या माध्यमातून दिला.

शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी १५४ कोटींच्या पाणीयोजनेतील गैरव्यवहार लपविण्यासाठी सत्ताधारी धुळेकरांची दिशाभूल करीत असल्याचा, खासदार, महापौर खोटी आश्वासने देत असल्याचा आरोप केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

water problem
Jalgaon News : विकासकामे दाखविण्यासाठी मनपात निधीची पळवापळवी..

योजनेत ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्यात आल्या, सात जलकुंभ नव्याने झाले. मात्र, तीन वर्षे उलटूनही नवीन जलवाहिन्या, जलकुंभ कार्यान्वित झाले नाहीत, असे श्री. माळी यांनी सांगितले.

आंदोलनात संगीता जोशी, मनीषा शिंपी, उज्ज्वला कोतकर, केसर राठोड, शिल्पा जाधव आदींसह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, श्री. माळी, पिंटू शिरसाट, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, पंकज भारस्कर, भरत मोरे, देवीदास लोणारी, सुनील पाटील, युवा सेनेचे हरीश माळी, विनोद जगताप, प्रवीण साळवे, हिमांशू परदेशी, दिनेश पाटील, कैलास मराठे, महादू गवळी, भटू गवळी, प्रकाश शिंदे, लक्ष्मण बोरसे, सिद्धार्थ करनकाळ, मोहित वाघ, अक्षय पाटील, शुभम रणधीर आदी सहभागी झाले.

water problem
Ram charan-upasana Good News : रामचरणची गोड बातमी, पण त्याचं जपानशी काय आहे कनेक्शन?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com