मनमाडच्या टंचाईमुळे रेल्वेची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक व रेल्वे जंक्‍शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणी संपल्यानंतर शहराला पस्तीस दिवसांत एकदाच पाणी पुरविले जात आहे. सध्या मनमाड रेल्वेस्थानकालादेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाने मनमाड स्थानकातून दररोज नाशिक मार्गाने मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी या रेल्वेगाड्यांतील बोगींमध्ये पाणी भरण्याची सुविधा नाशिक रोड स्थानकात केल्याने मनमाड ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला.

देवळालीगाव (जि. नाशिक) - संपूर्ण मनमाड शहरात पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्याची झळ रेल्वे प्रवाशांना व चाकरमान्यांना बसू नये, यासाठी रेल्वेने मनमाड स्थानकातून दररोज मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी या रेल्वेगाड्यांच्या बोग्यांत पाणी भरण्याची सोय नाशिक रोड स्थानकात केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक व रेल्वे जंक्‍शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणी संपल्यानंतर शहराला पस्तीस दिवसांत एकदाच पाणी पुरविले जात आहे. सध्या मनमाड रेल्वेस्थानकालादेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाने मनमाड स्थानकातून दररोज नाशिक मार्गाने मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी या रेल्वेगाड्यांतील बोगींमध्ये पाणी भरण्याची सुविधा नाशिक रोड स्थानकात केल्याने मनमाड ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला. ही सुविधा सलग तीन महिने सुरू राहील, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

पाणपोईतून घरासाठी पाणी
दररोज नोकरी-धंद्यानिमित्ताने नाशिकला ये-जा करीत असलेले काही चाकरमाने आपल्यासोबत घरूनच एक लिटरपासून ते पाच लिटरपर्यंतच्या बाटल्या सोबत आणत आहेत. घरी जाताना नाशिक रोड रेल्वेस्थानकातून पाणपोईतून थंड पाण्याच्या बाटल्या भरून नेत असल्याने "थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीचा प्रत्यय अनुभवायला मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage Manmad Railway Passenger Glance