महापौरांच्याच प्रभागात पाणीटंचाई 

महापौरांच्याच प्रभागात पाणीटंचाई 

नाशिक - महापौर रंजना भानसी यांच्याच प्रभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापौर भानसी यांनीच टंचाईचे वास्तव अधिकाऱ्यांसमोर मांडून हतबलता व्यक्त केली. पंचवटी विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढ करण्याबरोबरच गळती थांबविण्याच्या सूचना त्यांनी आज प्रशासनाला दिल्या. पाण्याच्या गंभीर विषयावर पंचवटीतील 24 नगरसेवकांपैकी 12 नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. 

पंचवटी विभागातून सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्यानंतर आज महापौरांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेत पुरवठ्याची स्थिती समजावून घेतली. नगरसेवक गुरमित बग्गा, अरुण पवार, कमलेश बोडके, पूनम धनगर, हेमंत शेट्टी, भिकूबाई बागूल, जगदीश पाटील, पुंडलिक खोडे, पूनम सोनवणे, प्रा. सरिता सोनवणे, सुनीता पिंगळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके व उदय धर्माधिकारी आदी उपस्थित होते. पंचवटी विभागातील पटेलपट्टी, कलानगर, दुर्गानगर, जाणता राजा कॉलनी या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मखमलाबाद येथेही नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती दिली जाते. टॅंकरची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. महापौर भानसी यांनी स्वतःच्याच प्रभाग एकमधील टंचाईचे वास्तव कथन केले. गोपाळनगर येथे नव्याने दोन जलकुंभांची निर्मिती करण्यात आली, तरीही टंचाई का निर्माण होत आहे, याबाबत त्यांनी सवाल उपस्थित केला. नगरसेवक अरुण पवार यांनी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप केला. नगरसेवक गुरमित बग्गा यांनी जलकुंभातील पाण्याची रोजची पातळी महापौरांना व नगरसेवकांना व्हॉट्‌सऍपद्वारे सादर करण्याची मागणी केली. 

पावसाळ्यापर्यंत जोडणी नको 
वरच्या मजल्यावरही नळजोडणी देण्याचा महापौर भानसी यांनी घेतलेला निर्णय पावसाळ्यापर्यंत अमलात आणू नये, अशी सूचना बग्गा व अरुण पवार यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com