नाशिक - बागलाण तालुक्यातील रातीर येथे भीषण पाणीटंचाई

दीपक खैरनार
शनिवार, 7 एप्रिल 2018

अंबासन (नाशिक) : रातीर (ता.बागलाण) येथे मार्च महिन्यातच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांसह मुक्या जनावरांवर दाही दिशा भटकंती करण्याची वेळ आली आहे. टंचाई काळात शासनाने गावात त्वरित टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी ग्रामपंचायतीने गेल्या दोन महिन्यांपासून प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या प्रस्तावावर अद्याप कोणतीही 
दखल घेण्यात आलेली नाही. शासनाने त्वरित गावात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सरपंच कैलास आहिरे व ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्यातील डोंगराळ भागात हे गाव वसलेले आहे. त्यामुळे सध्याच्या उन्हाळ्यात भूजल पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. परिणामी जानेवारीपासुनच तीव्र पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने दोन महिन्यापूर्वी शासकीय टॅकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दरवर्षी भीषण पाणीटंचाई भासते. तरीही टंचाई निवारणासाठी प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करीत नाहीत. पर्यायाने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ वणवण करावी लागत आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रात्री जागून पाणी भरावे लागत आहे. उन्हाळा सुरु होताच खाजगी व शासकीय टॅकरवर येथील गावांना तहान भागवण्यासाठी पंचायत समितीत उंबरठे झिजवावे लागतात. या भागात पाऊस कमी असल्याने कुठेलाही तलाव, छोटे-मोठे बंधारे पावसाळ्यात भरत नाहीत, परिणामी भीषण पाणी टंचाईची दाहकता निर्माण होते. शासकीय टॅकर सुरू करण्यासाठी शासनाने गावाशेजारील नाला, धरण, तलावातील गाळ काढल्याशिवाय शासकीय टॅकर मिळत नसल्याची आडमुठेपणाची भुमिका असल्याने गावांना वेठीस धरण्याचे काम केले जात असल्याचे बोलले जाते.

रातीर गावाजवळील नाल्यातील खोलीकरण करून गाळही काढण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, त्यावेळी सरपंच कैलास आहिरे, उपसरपंच केदा पगारे, पंचायत समिती सदस्य कान्हु आहिरे, माजी उपसरपंच समाधान आहिरे, केवळ आहिरे, नाना आहिरे, आनंदा आहिरे, नितीन आहिरे, ग्रामसेविका स्वाती देवरे, दादाजी आहिरे व ग्रामस्थ उपस्थित होते. गाळ उपसा झाला तरीही शासकीय टॅकर सुरू होत नसल्याने पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, प्रशासनाच्या वतीने टँकरची व्यवस्था करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

तालुक्यातील सात गावांसाठी शासकीय टॅकर सुरू करण्यात आले आहेत. यामुळे सात गावातील पिण्याच्या पाण्याची सोय असली तरी शासकीय टॅकरच्या माध्यमातून गैरव्यवहार होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे बोलले जाते. बागलाण तालुक्यात दीड महिन्यापासून तहसीलदार नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. अजूनही अनेक पाणीटंचाई गावातील प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून सादर करण्यात आल्याचे समजते.
 
Web Title: water shortage at Ratगr in Baglan taluka