पाण्यासाठी विद्यार्थी उतरले थेट विहिरीत

बोदवड - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी विहिरीत उतरून पिण्यासाठी पाणी घेताना.
बोदवड - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी विहिरीत उतरून पिण्यासाठी पाणी घेताना.

बोदवड (जि. जळगाव) - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयआयटी) संस्थेत पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थ्यांवर थेट विहिरीत उतरण्याची वेळ आली आहे. विहिरीत उतरून हे विद्यार्थी जीव धोक्‍यात घालून पाणी काढत आहेत.

"आयटीआय'ला पूर्णवेळ प्राचार्य मिळत नसल्याने या संस्थेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा नाहीत, प्रसाधनगृहांची अवस्था वाईट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तर जीव धोक्‍यात घालून विहिरीत उतरण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे. प्रशिक्षण संस्थेला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पंप नादुरुस्त झाला आहे. तो दुरुस्त करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. संस्थेच्या कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com