पाड्यांवरील तहानलेल्या जीवांची तृष्णा भागविणार

Tribal-Pada
Tribal-Pada

जळगाव - डोंगराच्या पायथ्याला, निसर्गाच्या कुशीत वसलेली ती गावे.. गाव तरी कसे म्हणावे, जेमतेम पन्नासएक कुडा मातीची घरं असलेले ते वनवासी पाडेच. ‘जीवन’ ज्याचे दुसरे नाव पाणीही केवळ पावसापुरते उरले.. कधी- काळी डोंगरावरून खळखळत येणारे झरेही संपून गेले..

कळशीभर पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू झाली... अशात, या पाड्यावरील जीवन सुसह्य करण्याचे प्रयत्न वनवासी कल्याण आश्रमाकडून सुरू आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून येत्या १० तारखेला दोन पाड्यांवर कूपनलिका व सौरपंप लावून पाणीपुरवठ्याचे विधायक कार्य होत आहे.

बऱ्याचशा पाड्यांवर सध्या हीच स्थिती. तरीही आपल्या प्राक्तनाला चिकटून हलाखीचे जीवन जगणे सुरू आहे. पाणी साठवण्याचे कसब नाही आणि माय बाप सरकारची योजनाही अजून पोचत नाही. अशा अनेक पाड्यांवरची दयनीय स्थिती संवेदनशील समाजापर्यंत, सरकारपर्यंत पोचवून काही हितचिंतक, काही समाजोपयोगी संस्था, प्रशासन यांच्या मदतीने काही प्राथमिक सुविधा ज्यामध्ये पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य व अन्य लहानसहान गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कल्याण आश्रमातर्फे सुरू आहे. 

दोन पाड्यांना मिळणार पाणी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुका केंद्रापासून २५ किलोमीटर अंतरावर वर्षानुवर्षे वसलेल्या पोयझिरा (डोंगरकठोरा) आणि इटवा. या दुर्गम आणि वीज नसलेल्या गावात ‘गंगा आली रे अंगणी’ या भगीरथ प्रयत्नांतर्गत जिल्ह्यातील काही समाज शिल्पी, प्रशासन यांच्या सहकार्याने १० जानेवारीला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अर्थ प्रायोजक शैलेंद्र पारेख व रजनीकांत कोठारी यांच्याहस्ते जलपूजन करून प्रारंभ करणार आहेत. मराठी सिनेमाचे दिग्दर्शक शैलेश पारेख यांच्या सहकार्याने बोरिंग करून, सौरपंप लावून वर उंचीवर पाण्याच्या टाक्‍या ठेवणे व जलपूजन करून वनवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय याद्वारे होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com