'गिरणा'च्या साठ्यात 7 टक्क्यांनी वाढ!

शिवनंदन बाविस्कर
रविवार, 19 ऑगस्ट 2018

शुक्रवारी (ता. 17) चणकापूर, हरणबारी आणि केळझर धरणे मिळून सुमारे तेरा हजार क्यूसेकने विसर्ग गिरणात सुरू होता. ही आवक रात्रं-दिवस कायम राहिली. त्यांनंतर धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. दरम्यान, पुनद धरणातूनही विसर्ग सुरू करण्यात आला होता.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : चणकापूर, हरणबारी आणि केळझर धरणातून विसर्गामुळे गिरणाच्या साठ्यात शनिवारी(18 ऑगस्ट) दिवसखेर 7 टक्क्यांनी घसघशीत वाढ झाली. यामुळे धरण 37 टक्के भरले आहे. तर, पुनद धरणातून देखील विसर्ग सुरू करण्यात आला होता.  

शुक्रवारी (ता. 17) चणकापूर, हरणबारी आणि केळझर धरणे मिळून सुमारे तेरा हजार क्यूसेकने विसर्ग गिरणात सुरू होता. ही आवक रात्रं-दिवस कायम राहिली. त्यांनंतर धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. दरम्यान, पुनद धरणातूनही विसर्ग सुरू करण्यात आला होता.

काल(18 ऑगस्ट) सायंकाळी सहाला चणकापूरमधून 1 हजार 498 क्यूसेक, पुनदमधून 847 क्यूसेक असे एकत्रित ठेंगोडामधून 3 हजार 444 क्यूसेक, हरणबारीमधून 1 हजार 643 तर केळझरमधून 450 क्यूसेक विसर्ग गिरणात सुरू होता. यामुळे गिरणेच्या साठ्यात चांगली वाढ होऊन धरण 37 टक्के भरू शकले. धरणात 6 हजार 837 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे, अशी माहिती उपअभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे व शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: water storage in Girna Dam