शहरात पाच एमएलडी पाण्याचा जादा वापर

Water-Storage
Water-Storage

जळगाव - एकीकडे पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या जळगाव शहरात पाण्याचा अधिक वापर वाढला आहे. शहराची दररोज १०० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) एवढी पाणीपुरठ्याची मागणी आहे. परंतु गेल्या पंचवीस दिवसांपासून वाढलेले ऊन, तीन दिवसांआड पाणीपुरवठा झाल्याने सुमारे ५ एमएलडी पाण्याचा वापर वाढल्याची विश्‍वसनीय माहिती समोर येत आहे.

यंदा पाऊस कमी पडल्याने वाघूर धरणात साठा कमी असून जळगावकरांवर पाणीसंकट निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे नियोजन केले जात असून, पाणीपुरवठा दोन दिवसांवरून तीन दिवसाआड केला. यामुळे नागरिक जास्तीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जास्त वेळ पाणीपुरवठा सोडावा अशी मागणी नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडून होत आहे. परंतु वाघूर धरणात केवळ १९ टक्के साठा असल्याने दररोज १०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी सांगितले.

व्हॉल्व्हमनकडे नागरिकांच्या तक्रारी
शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अनेक भागातून नागरिक पाणीपुरवठा करणारे व्हॉलमन यांच्याकडे तक्रार करू लागले आहेत. एक तासात पाणी पूर्ण भरले जात नसून पाणीपुरवठा करण्याची वेळ वाढवावी अशी नागरिकांकडून मागणी होऊ लागली आहे.

धरणातील पाणीपातळी घटली 
वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. वाघूर धरणात केवळ १९ टक्के पाणीसाठा असून पाण्याची पातळी केवळ २२६. ६५० मीटर पर्यंत सद्या आहे. त्यामुळे पाण्याचा वाढलेला वापर तसेच धरणाचा पाणीपातळी पाहता पाणीपुरवठा जास्तवेळ केला जाऊ  शकत नाही. 

डाऊन स्कीम कार्यान्वित करणार
पाण्याचे संकट पाहता गरज पडल्यास वाघुर धरणाची डाऊन स्कीम कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला आहे. त्यानुसार लवकरच डाऊन स्कीम कार्यान्वित करण्याचे काम सुरू करणार आहे. 

डाऊन स्कीमनंतर पाणीसाठ्याची उपलब्धता 
पाइपचा टॉप - पातळी २२०.२० मीटर, पाणीसाठा ५८.१७ दलघमी 
स्लज व्हॉल्व - पातळी २१५.०० मीटर, पाणीसाठा १४.४३ दलघमी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com