जलवाहिनी गळतीने जळगावकर हैराण

Waterline-Leakage
Waterline-Leakage

जळगाव - शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनीला कंडारी गावाजवळ गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीचे काम आज सुरू झाले असून, याला तीस तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

महापालिकेतर्फे वाघूर जलवाहिनीला लागलेल्या मोठ्या गळती दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार वाघूर धरणातून शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या १ हजार १६८ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला कंडारी गावाजवळ गळती लागलेली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम आज दुपारी चारपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामाला तीस तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे उद्या (ता. ३१) होणारा पाणीपुरवठा एक फेब्रुवारीला, तर एक फेब्रुवारीचा पाणीपुरवठा दोन फेब्रुवारीला आणि दोन फेब्रुवारीचा पाणीपुरवठा हा फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा अभियंता व शहर अभियंता डी. एस. खडके यांनी दिली.

शनिवारी या भागात होईल पाणीपुरवठा
खंडेरावनगर, पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बॅंक कॉलनी, आशाबाबानगर, मानराज टाकी परिसर, शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिकाश्रम, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिरा शिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसर, सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी.

शुक्रवारी या भागात होईल पाणीपुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, असोदा रोड, रामेश्‍वर कॉलनी, एम. डी. एस. कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्‍सानगर, अयोध्यानगर, शांतिनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, मोहननगर, नेहरुनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकरनगर, मानराज पार्क, असावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर- हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, योगेश्‍वरनगर, हिरा पाईप, शंकररावनगर, खेडी गाव-परिसर, तांबापुरा, श्‍यामाफायर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर, जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, ऑफिसर क्‍लब. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com