हमे अच्छे दिन नही, वही पुराने दिन चाहिये : छगन भुजबळ

रोशन खैरनार
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले.

सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले.

येथील राधाई मंगल कार्यालयात सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच समता परिषदेतर्फे आयोजित मेळाव्यात आर आर पाटील शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठाणतर्फे मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना भुजबळ यांच्या हस्ते 'खानदेश गौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मविप्र संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती यतींद्र पाटील, आंतरराष्ट्रीय संशोधक डॉ. जयेश सोनवणे आदि उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, सध्या राज्य शासन शेतकऱ्यांना बेइज्जत करण्याचे काम करीत आहे. कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांची घोर फसवणूक चालली आहे. कर्जाचे व्याज भरा त्यानंतर कर्जमाफी देऊ, अशी भाषा वापरणारे काय न्याय देणार ? शेतकऱ्यांचा कांदा, साखर महाग झाला कि केंद्र निर्यातबंदी करते आणि पाकिस्तान सारख्या परकीय देशातून या मालाची आयात सुरु होते. यावरूनच भाजप सरकारचे शेतकऱ्यांवरचे खरे प्रेम दिसून येते. महाराष्ट्राच्या भूमीत पडणारे पावसाचे पाणी महाराष्ट्रालाच मिळाले पाहिजे. मात्र ते गुजरातकडे वळविण्याचे कटकारस्थान हाणून पाडू, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.

सत्कारास उत्तर देताना डॉ. शेवाळे यांनी आपल्याला मिळालेला पुरस्कार तमाम शेतकरी बांधवाना समर्पित करीत असल्याचे जाहीर करून यापुढेही जलसंधारणाची कामे स्वखर्चाने करणार असल्याचे सांगितले. यावेळी रवींद्र पगार, आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, ज ल पाटील आदींची भाषणे झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन कार्य करून बागलाणचे नाव उज्वल करणारे येथील भूमिपुत्र डॉ. जयेश सोनवणे यांचा भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मेळाव्यास विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, रेखा शिंदे, भारत खैरनार, नगरसेवक काकाजी सोनवणे, किशोर कदम, डॉ. विठठ्ल येवलकर, डॉ. किरण अहिरे, संजय पवार, सुलोचना चव्हाण, सुरेखा बच्छाव, उषा भामरे, वंदना भामरे, जे. डी. पवार, किरण पाटील, नितीन सोनवणे, बाजार समितीचे संचालक केशव मांडवडे, संजय सोनवणे, सुनील खैरनार, शेमळीचे सरपंच अमोल बच्छाव, पंडितराव अहिरे, खेमराज कोर, मिलिंद शेवाळे, अरविंद सोनवणे, जिभाऊ सोनवणे, राजेंद्र सावकार, यशवंत भदाणे, सलीम पठाण, अनिल जाधव, अनिल चव्हाण, दिलीप चव्हाण, सोमदत्त मुंजवाडकर, निखील पवार, बबलू खैरनार, सनीर देवरे, सचिन जाधव, हितेंद्र बागुल, भिका सोनवणे, प्रवीण अहिरे, युवराज पवार, वैभव नंदाळे, भारत देवरे, दीपक देवरे, राकेश मोरे, केदा भामरे आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले.

दरम्यान, भुजबळ यांनी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी भुजबळ यांचा सत्कार केला.

भुजबळ म्हणाले....

- दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदनाची किंमत १०० कोटी तर ८५० कोटींचा अपहार झाला कसा ?
- लोकसभा निवडणूक प्रचारात परदेशातील काळे धन बाहेर काढून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकण्याची मोदींची वल्गना कुठे गेली ?
- करोडो बेरोजगारांच्या नोकऱ्यांचे काय झाले ?
- राज्यात महिला व मुली असुरक्षित असून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत.
- शासनाने माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे. एकही गुन्हा सिध्द झाल्यास फासावर जाण्याची तयारी आहे.
- भुजबळ फार्म हि माझी वैयक्तिक मालमत्ता आहे. तरीही टाच आणण्याचा प्रयत्न.
- हमे अच्छे दिन नही, वही पुराने दिन चाहिये.

Web Title: We do not have good days, the same old days should be: Chhagan Bhujbal