Vidhan Sabha 2019 : 'आम्हाला दत्तक बापाची गरज नाही'

Vidhan Sabha 2019 : 'आम्हाला दत्तक बापाची गरज नाही'

नाशिक : आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी, खरे प्रेम करणारा हवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच नाशिकचा विकास छगन भुजबळ यांनी केला. पण या सरकारने नाशिककडे साफ दुर्लक्ष केले, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, की आम्ही नाशिक दत्तक घेऊ. त्यावर शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची गरज नाशिककरांना नाही. आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी, खरे प्रेम करणारा हवा. नाशिकचा विकास छगन भुजबळांनी मोठ्या प्रमाणात केला. पण या सरकारने नाशिककडे साफ दुर्लक्ष केले. आता मात्र, हा इतिहासच पुस्तकातून काढण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून हे राज्य पुढे घेऊन जाणार आहोत, असे ते म्हणतात मात्र हा दुटप्पीपणा आहे.  

शिवाजी महाराजांचे कर्तृत्त्व समजावे म्हणून इतिहास

महाराष्ट्राच्या नव्या पिढीतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्त्व समजावे म्हणून इयत्ता चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com