PHOTOS : काय भानगड आहे ही..शासननिर्णय आहे की लग्नाचे आमंत्रण? बघा तरी...

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

विवाह म्हटलं की, डोळ्यांसमोर एक साधारण असं चित्र उभं राहतं.. पाहुणेमंडळींची लगबग, आकर्षक सजावट, भव्यदिव्य सेट्‌स, दागिन्यांनी आणि आभूषणांनी सजलेले दाम्पत्य, मोठ्या थाटात निघालेल्या मिरवणुका, सुग्रास भोजनांच्या पंक्ती आणि बरंच काही! पण नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील अमित कोठावदे आणि नाशिकची अनुजा बधान विवाहबद्ध होताना सामाजिक बांधीलकी जपण्याचा अभिनव प्रयत्न करताहेत. मंत्रालयामध्ये अधिकारी असणाऱ्या अमितने चक्क आपल्या लग्नाच्या पत्रिकेला शासनाच्या परिपत्रकाचे (GR:Government Resolution) स्वरूप दिले आहे. 

नाशिक : विवाह म्हटलं की, डोळ्यांसमोर एक साधारण असं चित्र उभं राहतं.. पाहुणेमंडळींची लगबग, आकर्षक सजावट, भव्यदिव्य सेट्‌स, दागिन्यांनी आणि आभूषणांनी सजलेले दाम्पत्य, मोठ्या थाटात निघालेल्या मिरवणुका, सुग्रास भोजनांच्या पंक्ती आणि बरंच काही! पण नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील अमित कोठावदे आणि नाशिकची अनुजा बधान विवाहबद्ध होताना सामाजिक बांधीलकी जपण्याचा अभिनव प्रयत्न करताहेत. मंत्रालयामध्ये अधिकारी असणाऱ्या अमितने चक्क आपल्या लग्नाच्या पत्रिकेला शासनाच्या परिपत्रकाचे (GR: Government Resolution) स्वरूप दिले आहे. 

Image may contain: 1 person, smiling, standing and closeup

कळवणच्या "अमित' वर मंत्रालयातील कामकाजाचा प्रभाव 

राज्यातील चिफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्रॅमसाठी 14 हजार इच्छुकांमधून मोजक्‍या 50 जणांची निवड केली जाते; त्यात अमित कोठावदेंचा समावेश होता. आता लग्न म्हटलं की, हौस-धामधूम तर आलीच; पण स्वतःचा आनंद साजरा करताना आपण सामाजिक भानही जपलं पाहिजे, असं अमितसह त्याच्या होणाऱ्या पत्नीला-अनुजा बधान हिलाही वाटतं. त्यामुळेच त्यांनी "सात फेरे-सात सामाजिक संकल्प' हा अभिनव उपक्रम स्वतःच्या विवाहदिनी सुरू करण्याचे ठरवले आहे. आयुष्यभर दोघे मिळून हे सात सामाजिक संकल्प ते पूर्ण करणार आहेत. इतकेच काय, ते वर आणि वधू अशा दोन्ही पक्षांतील आपल्या पाहुणेमंडळींना-मित्रमंडळींना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ते सोशल मीडियाद्वारे करीत आहेत. 

Image may contain: text

लग्नपत्रिकेला दिले शासन निर्णयाचे स्वरूप 
या नाविन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा समाज माध्यमांवर जोरदारपणे सुरू आहे. यामुळे नक्कीच लोकांमध्ये सामाजिक भान जपण्याची भावना निर्माण होईल, तसेच शासन निर्णयाबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत होईल, असा विश्‍वास अमित व अनुजाला आहे. या लग्न पत्रिकेमध्ये सर्व बाबी शासन निर्णयाप्रमाणे मांडलेल्या आहेत. ज्यामध्ये विधिलिखित शासन निर्णय यापासून पत्रिकेची होणारी सुरुवात उपसचिव विवाह विभाग इथे येऊन थांबते. यामध्ये वर विभाग, वधू विभाग, मा. संचालक वर विभाग आणि वधू विभाग, प्रस्तावना, शासन निर्णय, उपसंचालक, अटी व शर्ती, डिजिटल स्वाक्षरी आदी बाबींचा समावेश केलेला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wedding Invitation like Government Document Nashik Marathi News