बागलाणच्या पश्चिम पट्यातील डोंगर जळून खाक; आग विझवण्यासाठी वनविभागाचा कोणताच प्रयत्न नाही

रोशन भामरे 
रविवार, 22 एप्रिल 2018

तालुका व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वसामान्यांची मते जाणून घेतली असता वन विभागापेक्षा जनताच वन संपदेचे संवर्धन व रक्षण करण्यास सक्षम असते.

तळवाडे दिगर (जि. नाशिक) - प्राचीन ऐतिहासिक काळापासून असलेल्या बागलाण तालुक्यातील डोंगरांना लागणाऱ्या वणव्यामुळे धगधगणारी आग आणि डोळ्यासमोर शेकडो एकरावरील जळून खाक होणारी वनसंपदा हे दृशचक्र वनविभाग थांबवू का थांबवू शकत नाही? यावर्षी शेकडो हेक्टरवरची जंगले व वनसंपदा जळून कोट्यावधी रुपयांची वनसंपदा नष्ट झाली आहे. प्रतिवर्षी लागवड होणाऱ्या झाडांचे पुढे होते काय? याची एकदा तपासणी करा. लावलेली झाडे जागवण्याची जबाबदारी आणि पहिल्या जंगलांच्या संरक्षणाची जबाबदारी निश्चित करून ठराविक वर्षासाठी कऱ्हाड बंदी जाहीर करा, अशा मागण्या आता जनतेतून समोर येत आहेत.

तालुका व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वसामान्यांची मते जाणून घेतली असता वन विभागापेक्षा जनताच वन संपदेचे संवर्धन व रक्षण करण्यास सक्षम असते. जनता झाडे लावडे, वन खाते मात्र झाडे तोडायचा परवाना देतो, ही अत्यंत चिंताजनक व पर्यावरणाला हानिकारक बाबा आहे.

प्रतिवर्षी चढत्या क्रमाने दोन कोटी, चार कोटी, तेरा कोटी अशा वृक्ष लागवडीच्या घोषणा होतात.वृक्ष लागवडही होऊन प्रतिवर्षी कोट्यावधी रुपये धुळीत जातात. मात्र काहीजण यातही खिसे भरण्याचे उद्योग करतात, अशी चर्चा नेहमीच जनतेमध्ये सुरु असते. त्यासाठी वृक्ष लागवडीनंतर ते जगल्याचे जनतेला दिसणे आवश्यक आहे. यात जनतेचीही मदत वनविभागाने घेतल्यास वनविभाग आणि सर्वसामान्य यांच्यातील अंतरही कमी होण्यास मदत होणार आहे.

तळवाडे दिगर परिसरात गेल्या एका महिन्यात दहा ते पंधरा डोंगरांना वणवे लागले असून त्यामुळे हजारो हेक्टर वनसंपदा नष्ट झाली आहे.मात्र एकही डोंगराला लागलेली आग विझवण्यासाठी वनविभागामार्फत कोणतेही पाऊल मात्र उचले गेले नाही. की कुणी फारसे प्रयत्नही केल्याचे दिसले नाही.

तालुक्याच्या पश्चिम पट्यातील तळवाडे परिसरातील येथील खलप, भिलाई, रोह्या, उबरमाळ, भीत, ब्राम्हणदारा आदी अशा पंधरा ते वीस डोंगरांना आगी लागून हजारो हेक्टरवरील वनसंपदा जाळून खाक झाली असून परिसरात काहीसा अपवादात्मक भाग वगळता संपूर्ण परिसर जळून खाक झाला आहे.

सर्वसामान्यांना विश्वासात घेणे आवश्यक
सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यांच्यात नेहमीच अंतर असते. त्यात वनविभाग म्हटल की सर्वसामान्य चार हात लाबच राहतात. त्यामुळे भविष्यात जंगलाणा लागणाऱ्या आग रोखण्यासाठी विभागाने स्थानिक जनतेलाही विश्वासात घेत आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. 

"वनविभागाने व सामाजिक वनीकरण विभागाने सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन आणि जनजागृती करुन काम केलं पाहिजे. 1 कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्यच आहे, पण जी झाडे आहेत त्यांचे अगोदर संवर्धन व संगोपन करणे काळाची गरज आहे. ग्लोबल वार्मिंगचा धोका अगोदरच 'आ' वासून उभा आहे. तरी देखील पर्यावरण संतुलनाचा विचार प्रशासन कधी करेल??'' - श्री. यशवंत धोंडगे निसर्ग प्रेमी, आदर्श व स्मार्ट ग्राम किकवारी खुर्द                                                                                                            
"वानवा लागणारे वनक्षेत्रास सभोवतील गावातील सहकार्य व सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ता यांची निवड कडून आग लावण्यात येणाऱ्यांची गुप्त माहिती मिळवण्याचे काम सुरु आहे. नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.तसेच गावागावात गुराखी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा व विचार विनिमय करून उपाययोजना करण्यात येत आहे. ठराविक ठिकाणी वणवा बाबत शासकीय फलक लावून आगी नियंत्रणात आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन व शासकीय नियमानुसार कारवाई बाबत माहिती देण्यात आली आहे.आगी लागणारे वनक्षेत्रातील ठिकाणे यांची पूर्ण माहिती भविष्यात नियोजन करण्यासाठी ठेवण्यात येत आहे. - वसंत पाटील वनक्षेत्रपाल, सटाणा

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: On the west side of Baglan the mountains burned