गव्हाचे क्षेत्र वाढले; ज्वारीसह मक्‍यात घट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नाशिक - देशात यंदा चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पेरण्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. गव्हाची लागवड वाढली आहे; पण त्याचवेळी ज्वारी, मका आणि कडधान्याच्या क्षेत्रामध्ये घट झाली आहे. देशामध्ये रब्बीचे सरासरी क्षेत्र 1 कोटी 55 लाख 76 हजार हेक्‍टर इतके आहे. यंदा आतापर्यंत 1 कोटी 46 लाख 85 हजार हेक्‍टरवर म्हणजेच, 94.27 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्याच्या मध्यापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार हेक्‍टर क्षेत्र पेरणीखाली आले होते.

गव्हाचे सरासरी क्षेत्र 44 लाख 6 हजार हेक्‍टर इतके आहे. त्यापैकी 25 लाख 72 हजार हेक्‍टरवर गव्हाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी 18 लाख 65 हजार हेक्‍टरवर लागवड झाली होती. मात्र ज्वारीचे क्षेत्र अद्याप 12 लाख हेक्‍टरहून गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. 28 लाख 14 हजार सरासरी हेक्‍टरपैकी यंदा 16 लाख 21 हजार हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. मक्‍याच्या 3 लाख 4 हजार सरासरी क्षेत्रापैकी 2 लाख 63 हजार हेक्‍टरवर लागवड झाली असून, गेल्या वर्षी लागवडीखालील क्षेत्र 3 लाख 26 हजार हेक्‍टरपर्यंत होते. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत कडधान्याची पेरणी गेल्या वर्षी 69.97 टक्‍क्‍यांपर्यंत झाली होती. हीच पेरणी यंदा 66.62 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे.

Web Title: wheat crop field increased