नांदगावला कधी मिळणार तहसीलदार ? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

नांदगाव - चंद्रकांत देवगुणे ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाल्यापासून नांदगावला तहसीलदार पद रिक्त आहे. येथील तहसीलदारपदाचा अतिरिक्त स्वरूपाचा पदभार मालेगावचे शहर कार्यकारी दंडाधिकारी आवळकंठे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

नांदगाव - चंद्रकांत देवगुणे ३१ जानेवारीला सेवानिवृत्त झाल्यापासून नांदगावला तहसीलदार पद रिक्त आहे. येथील तहसीलदारपदाचा अतिरिक्त स्वरूपाचा पदभार मालेगावचे शहर कार्यकारी दंडाधिकारी आवळकंठे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

निवासी नायब तहसीलदार संवर्गातील पद उपलब्ध असतांनाही जिल्हा प्रशासनाने वाय. बी. जमदाडे या नायब तहसीलदारांकडे सोपविले होते. उपजिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांचे अधिकार अथवा पदभार सुपूर्द करण्याबाबतचे जमीन महसूल १९६७च्या १० कलमानुसार शक्ती बहाल करण्याच्या निकषाला बाजूला ठेवून नायब तहसीलदारांकडे पदभार सोपविण्याच्या कार्यपद्धतीमुळे जिल्हा प्रशासनाही कार्यपद्धती विवादात आली होती. त्यानंतर आता नांदगावच्या तहसीलदार पदासाठीचा अतिरिक्त कारभार मालेगावचे शहर कार्यकारी दंडाधिकारी एस. व्ही. आवळकंठे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

मात्र गेल्या सहा महिन्यापासून असलेले तहसीलदाराचे पद कधी भरले जाणार हा प्रश्न कायम राहिला आहे. मालेगाव सह नांदगावचा कारभार अशी दुहेरी जबाबदारी आवळकंठे यांना पार पाडण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. चंद्रकांत देवगुणे यांचा अपवाद वगळता नांदगावला गेल्या तीन वर्षाहून अधिक काळासाठी तहसीलदार रिक्त राहिले आहे. जमदाडे यांच्या प्रमाणेच येवल्याच्या नायब तहसीलदार पूनम दंडिलें यांच्याकडे नांदगावचा तहसीलदारपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. शिवाय गेल्या साडेतीन वर्षात परीक्षाविधीन तहसीलदारांची नियुक्ती करून कामकाज पुढे रेटण्यात आले. होते नाशिक जिल्ह्यात सटाणा पाठपोठ महसुली प्रयोगशाळेचे स्वरूप प्राप्त झालेल्या नांदगावला तहसीलदार पदाच्या नियुक्तीचे घोंगडे भिजून पडले आहे. 

दरम्यान, नांदगावला अतिरिक्त तहसीलदार पदाची सूत्रे स्वीक्कारलेल्या एस व्ही आवळकंठे यांचे शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख सुनील जाधव, सागर हिरे, अय्याज शेख, अरुण भोसले, वाल्मिक निकम यांनी स्वागत केले यावेळी आवळकंठे यांचे शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
 

Web Title: When will we get nandgaon tehsildar?