नांदण्यास येत नसल्याने पत्नीचा गळा आवळून खून

Crime
Crime

नाशिक - कॉलेज रोडच्या गजबजलेल्या परिसरातील कमर्शियल कॉम्प्लेक्‍सच्या टेरेसवर विवाहितेचा खून झाल्याचे उघडकीस आले. नांदण्यास येत नसल्या कारणावरून पतीनेच विवाहितेचा मंगळवारी (ता. ८) रात्री खून केला. बुधवारी (ता. ९) दुपारी ही बाब उजेडात आली. 

पायल संजय परदेशी ऊर्फ पायल जयेश दामोदर (वय २०, रा. तपोवन, नाग चौक, पंचवटी) असे विवाहितेचे नाव आहे. कॉलेज रोडवरील पंचम हॉटेलच्या लेनमध्ये सत्यम लीला बिल्डिंगच्या टेरेसवर पायलाचा मृतदेह आढळला.

बुधवारी सकाळी साडेअकरा-बाराच्या सुमारास सत्यम लीला इमारतीच्या सुरक्षारक्षकाची पत्नी टेरेसवर गेली असता, त्या ठिकाणी पायलचा मृतदेह दिसला. सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील, गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, सहाय्यक निरीक्षक समीर वाघ घटनास्थळी पोचले. त्याच इमारतीत असलेल्या एका कार्यालयामध्ये तिचा पती संशयित जयेश दामोदर नोकरी करत असल्याचे समोर आले. त्यानेच रात्री पायलचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. संशयित जयेश दामोदर फरारी झाला. सुरेश संजय परदेशी यांच्या फिर्यादीनुसार, जयेश दामोदरविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

...अशी झाली उकल
पायल परदेशीचे जयेशसोबत प्रेमसंबंध होते. ती अल्पवयीन असतानाच संशयित जयेश तिला पळवून धुळ्याला घेऊन गेला होता. तिकडेच त्यांनी लग्न केले होते. संजय परदेशी यांनी आडगाव पोलिसांत तक्रार दिल्याने पोलिसांनी तिला शोधून आणले. साडेसतरा वर्षांचीच असल्याने तिला पोलिसांनी मुलींच्या वात्सलयात भरती केले होते. १८ वर्षांची पूर्ण झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला घरी आणले. काही दिवसांतच ती परत जयेश दामोदरच्या हिरावाडीतील घरी जाऊन राहू लागली. परंतु त्यांच्यात सारखे वाद होत असल्याने सहा महिन्यांपासून ती आई-वडिलांकडेच राहात होती. पायल कॉलेज रोडवरील सर्वांगी या साड्यांच्या दुकानामध्ये सेल्सगर्ल म्हणून नोकरीला होती.

जयेश हा सत्यम लीला इमारतीतील पहिल्या मजल्यावरील एका कार्यालयात कामाला होता. त्यांच्यात सतत संपर्क होता. मंगळवारी (ता. ८) सायंकाळपर्यंत पायल तिच्या आईच्या संपर्कात होती. मात्र रात्री साडेनऊनंतर तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. फिर्यादीनुसार, पायल जयेशकडे गेली आणि त्यानंतर त्याने तिला टेरेसवर नेले. त्याठिकाणी त्यांच्यात वाद होऊन त्याने तिचा गळा आवळून खून केला. बुधवारी सकाळी जयेश याने त्याच्या कार्यालयामधील मित्राला फोन केला आणि त्यास घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर घटनेची उकल झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com