जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीविरोधात जिल्हाभर आंदोलन करू!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

येवला : शेतकरी दुष्काळ,पावसाभावी खरीपाचे नुकसान,कर्जमाफीचा लाभापासून वंचित राहण्याचे दुख सहन करत आहेत. अशात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी कर्जवसुलीसाठी सक्तीची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चालू केले आहे. ही वसुली न थांबल्यास जिल्हाभर आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

येवला : शेतकरी दुष्काळ,पावसाभावी खरीपाचे नुकसान,कर्जमाफीचा लाभापासून वंचित राहण्याचे दुख सहन करत आहेत. अशात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी कर्जवसुलीसाठी सक्तीची मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चालू केले आहे. ही वसुली न थांबल्यास जिल्हाभर आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

नाशिक येथे अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांना निवेदन देऊन शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतु पाटील झांबरे, शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे,तालुकाध्यक्ष अरूण जाधव,निफाडचे सांडुभाई शेख,रामकृष्ण बोंबले, शंकर पुरकर, बाळासाहेब गायकवाड, योगेश सोमवंशी, भगवान बोराडे विलास कवडे  यांच्यासह शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने वास्तव स्थितीची माहिती दिली.यावर सागर यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधकांशी बैठक बोलावून मार्ग काढण्याचे अश्वासन दिले.जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क करण्याचे आश्वासन दिले व संबंधित निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्‍यांनी पिक कर्ज घेऊन पिक उभे केले, दोन वर्षे दुष्काळ आणि मागील वर्षी चांगले पिकं आले तर नोटबंदीचा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसला.शेतीमाल मातीमोल विकावा लागला.नंतर पैसा नसल्याने चेक देऊन व्यापाऱ्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे राज्याने पाहिले. आज सुद्धा अनेक शेतकर्‍यांचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकून पडले आहेत.अश्यातच बँकेने पिक कर्ज, मध्यम मुदत,दिर्घ मुदत कर्ज या वसुलीसाठी जप्ती, लिलाव या सारखे अघोरी उपायाचे हत्यार उपसल्याने शेतकरी धास्तावले आहे.

जिल्हा बँक शेतकरी कर्जामुळे अडचणीत आली नसून अनेक संचालकांच्या संस्था, तोट्यात आलेले साखर कारखाने यांना मनमानी कर्ज वाटप करण्यात आले आणि त्या सर्वावर नोटबंदीची छाप म्हणून सहकारी बँका अडचणीत आल्या हे शेतकरी संघटनेने अप्पर जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्वरित कारवाई होऊन सक्तीची वसुली तातडीने थांबविण्यात यावी अन्यथा शेतकरी संघटना जिल्हाभर आंदोलन उभारेन असा इशारा यावेळी दिला.

Web Title: will do agitation if they do compulsory recovery