महिलांना रोजगार मिळवून देणार : मंगला भास्कर

will give jobs to women - Mangala Bhaskar
will give jobs to women - Mangala Bhaskar

सटाणा : सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी झटणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. समाजातील महिलांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांना सक्षम करण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रभागी असते. बागलाण तालुक्यातील महिलांसाठी शिवसेनेतर्फे बचत गट स्थापन करून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या नूतन संघटक मंगला भास्कर यांनी येथे केले.

येथील शासकीय विश्रामगृहावर नाशिक जिल्हा शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजित बागलाण तालुक्यातील शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भास्कर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, बागलाण तालुका विधानसभा संघटक आनंद महाले, माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख सीताराम जाधव आदी उपस्थित होते. 

भास्कर म्हणाल्या, महिला या समाजाच्या जडणघडणीतील मुख्य घटक असून भावी पीढीचे भवितव्य घडवण्याचे काम त्या करत असतात. त्यांचा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे. आजची महिला ही अबला नसून सबला झाली आहे. महिलांनी स्वंयरोजगाराच्या माध्यामातून कुटुंबाला हातभार लावायला हवा. घरगुती लघूउद्यागांच्या माध्यमातून, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन काम करावे व स्वतःचा उत्कर्ष करावा. शिवसेना महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. महिलांनी अधिकाधिक संख्येने शिवसेना महिला आघाडीचे सभासद होऊन पक्षाद्वारे समाजकार्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही भास्कर यांनी केले.

यावेळी उपस्थित महिलांना घासणी व कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून घरगुती स्वरुपात केल्या जाणाऱ्या उद्योगांची माहिती देण्यात आली. मेळाव्यास अश्विनी बागुल, रुपाली संधानशिव, सुवर्णा पवार, मनीषा पवार, मनीषा अहिरे, संगीता पवार, विद्या पवार, कविता अहिरे, नंदा नंदन, रेखा साळवे, सारिका चव्हाण, वैशाली चव्हाण, चंद्रकला पवार, सारिका पवार, सरला सोनवणे, संगीता अहिरे, सुचिता नंदन, उषाबाई नवसार आदींसह तालुक्यातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूल मधील सायली अहिरे या विद्यार्थिनीने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत सायलीने मिळविलेल्या या यशाबद्दल आज शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे जिल्हा संघटक मंगला भास्कर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com