पावणेसहा लाखांचा मद्यसाठा नाशिकमध्ये जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नाशिक - नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे मद्यविक्रीवर बंदी असताना, तसेच महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने पाच लाख 80 लाखांचा अवैध देशी-विदेशी व बनावट मद्यसाठा जप्त केला. नाशिक शहरातून अडीच लाखांच्या अवैध मद्यसाठ्याचा समावेश आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघांसाठी उद्या (ता. 3) मतदान असल्याने तत्पूर्वीच दोन दिवस जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने आज सकाळी पंचवटीतील वाघाडी परिसरातील वाल्मीकनगरमध्ये छापा टाकून देशी-विदेशी व बनावट मद्याचा साठा जप्त केला. वाघाडीतील वाल्मीकनगर परिसरात एका बंद घरामध्ये परराज्यातील देशी-विदेशी मद्यसाठा, बनावट मद्याचा साठा असा एक लाख आठ हजार 908 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयितांचा शोध घेतला जात आहे. त्याच वेळी पथकाने वाल्मीकनगरमधील दामोदर गार्डनशेजारील घरावर छापा टाकला असता, त्या ठिकाणी 31 हजार 895 रुपयांच्या मुद्देमालासह संशयित तुळशीराम खंदारे यास अटक केली. त्याचप्रमाणे राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या भरारी पथकाने काल रात्री शालिमार चौकात रिक्षातून देशी-विदेशीचा एक लाख 17 हजार 312 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

Web Title: wine seized in nashik