दोन जुळ्या मुलींसह महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

  • जामोदमध्ये दोन जुळ्या मुलींसह महिलेचा विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
  • या घटनेत दोन मुलींचा मृत्यू. महिला गंभीर
  • शनिवारी (ता. 13) सायंकाळी साडे सातच्या सुमारास घटना
  • शितल मोहन भगत ( वय३२ ) असे महिलेचे नाव तर त्रिशा व दिव्या अशी मृत पाच महिन्यांच्या जुळ्या मुलींची नावे

जळगाव - जामोदमध्ये दोन जुळ्या मुलींसह महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये दोन मुलींचा मृत्यू झाला. असून महिला गंभीर जखमी आहे. शनिवारी (ता. 13) सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. शितल मोहन भगत ( वय३२ ) असे महिलेचे नाव असून त्रिशा व दिव्या  अशी मृत पाच महिन्यांच्या जुळ्या मुलींची नावे आहेत. 

शितल यांना प्रथम खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. नंतर अकोला येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मोहन भगत हे शेती करतात. त्यांचा यापूर्वी एक विवाह झाला होता. जेमतेम एक दीड वर्षाच्या आतच पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला. पहिली पत्नी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील असल्याचे समजते. मोहन यांची दुसरी पत्नी शितल या सुनगाव येथील असून त्यांचा सुद्धा यापूर्वी एक विवाह झालेला होता .शीतलला पाच महिन्याच्या दोन जुळ्या मुली असून काही दिवसांपूर्वीच त्यांचे जावळ काढण्याचा कार्यक्रम झाला. ह्या दोन मुलींपैकी दिव्या मुलीला अकरा बोटे होती. काही दिवसांपूर्वीच शीतल दोन मुलीला सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर काल शीतल यांनी दोन मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरितच आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman suicide attempt with two twin girls in Jamod Jalgaon