महिला व बालकल्याण सभापतिपदी आहिरे बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

नाशिक - महिला व बालकल्याण समितीत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असतानाही गटनेत्यांमार्फत ‘व्हीप’ बजावल्याने भाजपची कमकुवत मानसिकता आज दिसून आली. भाजपतर्फे समितीच्या पाचही सदस्यांना व्हीप बजावल्याने वेळेआधीच सर्व सदस्य आज हजर झाले. भाजपचा ताकही फुंकून पिण्याच्या सावधगिरीच्या भूमिकेचा मार्ग शिवसेनेने माघारी घेऊन सोपा करून दिला. सभापतिपदी नाशिक रोड भागातील नगरसेविका सरोज आहिरे यांची, तर उपसभापतिपदी सिडकोतील नगरसेविका कावेरी घुगे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. 

आज दुपारी चारला विभागीय अप्पर महसूल आयुक्त जोतिबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया झाली. सभापती व उपसभापतिपदाच्या उमेदवारांसह भाग्यश्री ढोमसे, प्रियंका घाटे, शीतल माळोदे प्रथम हजर झाल्या. शिवसेनेच्या उमेदवार नयना गांगुर्डे यांच्या व्यतिरिक्त विरोधातील शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, पूनम मोगरे उपस्थित झाल्या. सर्वांत शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीना मेमन सभागृहात उपस्थित झाल्या. विरोधातील सर्व सदस्य हजर होण्याच्या आतच नयना गांगुर्डे यांनी अर्ज मागे घेऊन सरोज आहिरे यांचा मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर कावेरी घुगे यांच्याविरोधात उमेदवारच नसल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, नगरसेवक उद्धव निमसे, नगरसेविका संगीता गायकवाड, हेमंत शेट्टी आदींनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींचे अभिनंदन केले.
 
महिला व बालकल्याण समितीसाठी अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या पाच टक्के निधीबरोबरच शासनाकडून विविध प्रकल्पांसाठी निधी आणू.
- सरोज आहिरे, सभापती

समितीच्या माध्यमातून महिला व बालकांसाठी चांगल्या योजना राबविण्याचा प्रयत्न करू. अंगणावाडीचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करू.
- कावेरी घुगे, उपसभापती

Web Title: Women and child welfare chairman saroj aahire