PHOTOS : महिला गिर्यारोहक गड-किल्ले सफर करण्यात अग्रेसर...

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात आपले पाय रोवून उभ्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात गुंतलेल्या महिला सध्या गड-किल्ले सर करण्यासाठी सरसावता आहेत. अशा महिलांना शहरातील अनेक संस्था प्रशिक्षण देतांना गिर्यारोहणासाठी सज्ज करीत आहेत. प्रारंभी सराव करतांना त्यातून प्राप्त अनुभवाच्या जोरावर काठीण्य पातळीत वाढ केली जात आहे. 

नाशिक : शहरातून वर्षंभरात हजारो महिला व मुली गिर्यारोहणाचा आनंद घेताय. शहरात जवळपास वीस ते पंचवीस संस्था ह्या गिर्यारोहकासाठी काम करतात. त्याव्दारे ते महिलांना प्रशिक्षण देतात, सर्वांत आधी अंजनेरी याठिकाणी गिर्यारोहणासाठी चढाई केली जाते. त्यानंतर एक दिवसीय, तीन दिवसीय अशा मोठ्या किल्ले सर केले जातात. वैनतेय, दुर्ग-दुर्ग, साहस, दुर्गखंड, आयबेक्‍स, ट्रेक सोल्स, ग्रेट आऊटडोअर ह्या संस्था गिर्यारोहकांसाठी काम करतात. 

अनुभवाच्या जोरावर काठीण्य पातळीत वाढ

पुरुषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात आपले पाय रोवून उभ्या आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात गुंतलेल्या महिला सध्या गड-किल्ले सर करण्यासाठी सरसावता आहेत. अशा महिलांना शहरातील अनेक संस्था प्रशिक्षण देतांना गिर्यारोहणासाठी सज्ज करीत आहेत. प्रारंभी सराव करतांना त्यातून प्राप्त अनुभवाच्या जोरावर काठीण्य पातळीत वाढ केली जात आहे. 

Image may contain: one or more people, outdoor and nature

विविध संस्थांकडून होतय मार्गदर्शन
शहरात जवळपास वीस ते पंचवीस संस्था ह्या गिर्यारोहकासाठी काम करतात. त्याव्दारे ते महिलांना प्रशिक्षण देतात, सर्वांत आधी अंजनेरी याठिकाणी गिर्यारोहणासाठी चढाई केली जाते. त्यानंतर एक दिवसीय, तीन दिवसीय अशा मोठ्या किल्ले सर केले जातात. वैनतेय, दुर्ग-दुर्ग, साहस, दुर्गखंड, आयबेक्‍स, ट्रेक सोल्स, ग्रेट आऊटडोअर ह्या संस्था गिर्यारोहकांसाठी काम करतात. सुरक्षितपणे गड किंवा किल्ला चढण्याची काळजीबाबत संस्थांकडून मार्गदर्शन केले जात आहे. गिर्यारोहणाला जातांना त्यांच्यासोबत 
एक व्यक्ती असतो, जो पहिल्यांदा गिर्यारोहण करणाऱ्या महिला व मुलींना सुरक्षितपणे मार्गदर्शन करतो. दर महिन्याला शहरातील जवळपास दोनशे ते तीनशे महिला गिर्यारोहणाचा अनुभव घेत आहेत. अनेकींना तर हिमालय सर करण्याचेही वेध आता लागले आहेत. युवती व महिलांमध्ये साहसाची आवड निर्माण करण्याबरोबरच निसर्गाबद्दल ओढ निर्माण करण्याचे काम गिर्यारोहणाच्या माध्यमातून होत असते. गड-किल्ले, दुर्ग-कडे, सुळके, बुरूज, शिखरे या गोष्टी पाहण्यापेक्षा त्यांचे वाचन कसे करावे हे गिर्यारोहणातून समजते. यातून गड, किल्ले कसे पाहावेत, तिथल्या पांरपारिक चालीरीती कोणत्या, त्यामागचा इतिहास काय आहे, निरक्षीर पध्दतीने त्यांचा अभ्यास कसा करावा, तेथील भौगोलिक परिस्थितीचे अवलोकन कसे करावे, कडे आणि सुळक्‍यांची भव्यता आणि भीषणता, त्या परिसरातील वाटाड्यांचे महत्व 
अशा अनेक गोष्टींविषयी मार्गदर्शन ह्या संस्था करतात. गिर्यारोहणासाठी साधारणतः वयाचे बारा ते सत्तरवर्षांपर्यंतच्या मुली व महिलांचा समावेश आहे. शहरातून वर्षंभरात हजारो महिला व मुली गिर्यारोहणाचा आनंद घेताय. 

गिर्यारोहणासाठी जाताना अशी घ्यावी काळजी 

मोठ्या चढाईला जात असताना ट्रॅकसुट, चष्मा, पाणी बाटली, बॅटरी, प्रथमोपचारपेटी, खाण्यासाठीचे हलके पदार्थ, ट्रॅक बॅग, स्पोर्टस शुज, थकवा जाणवू नये यासाठी ओ.आर.एस पावडर अथवा ग्लुकोज पावडर सोबत घेणे आवश्‍यक असते. 
 
Image may contain: one or more people, people standing and outdoor

जिल्हातील गिर्यारोहणसाठी प्रसिद्ध ठिकाणे 

रामशेज किल्ला, साल्हेर, मुल्हेर, मांगीतुंगी, सह्याद्री रांगा, हरिश्‍चंद्र गड, इंद्राई, कळसुबाई शिखर, सातमाळरांगा, अंजनेरी, हरिहर, अनकाई, धोडप, पांडवलेणी, अलंग, कुलंग, अचलगड, टंकाई, ब्रम्हगिरी, वाघेरा, कन्हेरा, कावनई, हातगड, वितानगड याठिकाणी शहरातील महिला व मुली गिर्यारोहण करतात. तसेच आत्मविश्‍वास व 
धाडस वाढले की हिमालय पर्वत सर करतात. वर्षांतून एकदा हिमालय सर केला जातो. 

 नक्की बघा > PHOTOS : अकराव्या वर्षी समजले किन्नर झाल्याचे...अन् थेट झाली लोकांची आयडॉल!

गिर्यारोहकांचा अनुभव

मी गेल्या पस्तीस वर्षांपासून गिर्यारोहण करते आहे. नाशिक जिल्ह्यातील सुंदर निसर्गसौंदर्याने नटलेले दुर्गम किल्ले व सुळके अनेकवेळा सर केले आहे. भविष्यातही अनेक किल्ले सर करण्याची इच्छा आहे. - सुषमा मिशाळ, गिर्यारोहक 

 Image may contain: 4 people, people smiling, mountain, outdoor and nature
मी जवळपास 17 वर्षांपासून गिर्यारोहण करत आहे. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर शांती मिळते. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव राहत नाही. याचबरोबर इतिहास उलगडतो. - दिपाली गडाख, गिर्यारोहक 

 
गिर्यारोहण क्षेञात काम करताना महिलांच प्रतिनिधित्व नेहमीच प्रेरणादायी ठरत आहेत. 30 ते 35 वर्षांपूर्वी सुषमा मिसाळ व शैला वाणी या महिलांनी हिमालयातील प्राथमिक कोर्स पूर्ण करून महिलांचा या साहसी खेळातील सहभाग निश्‍चित केला आहे. - भाऊसाहेब कानमहाले, वैनतेय संस्था 

हेही बघा >  धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women leading in mountaineering a fortress nashik marathi news