महिला अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नाशिक - शर्तीच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहार प्रकरणात सरकारची तब्बल पावणेचार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या येवल्याच्या प्रांत वासंती माळी, तसेच प्रभारी तहसीलदार प्रणिती दंडिले यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. याप्रकरणी माळी यांच्यासह 24 संशयितांविरोधात नांदगाव पोलिसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. नांदगाव तालुक्‍यात तीनशे एकर शासकीय शर्तीच्या जमीन खरेदी-विक्री प्रकरणामध्ये शासनाचा 50 टक्के महसूल बुडविल्याचा ठपका तत्कालीन अधिकाऱ्यांवर ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या महिन्यात नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. यात तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन, येवल्याच्या प्रांत वासंती माळी, प्रभारी तहसीलदार प्रणिती दंडिले यांच्यासह 24 जणांचा समावेश आहे.
Web Title: women officer Granted anticipatory bail