सटाणा बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला सभापती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

सटाणा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मंगला प्रवीण सोनवणे तर उपसभापतीपदी सरदारसिंग जावबा जाधव यांची काल गुरुवार (ता.२१) रोजी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चांदवडचे उपविभागीय अधिकारी संदीप भंडारे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समितीचे सचिव भास्कर तांबे व चंद्रकांत विघ्ने यांनी काम पाहिले. दरम्यान, सटाणा बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला सभापती होण्याचा बहुमान सौ.सोनवणे यांनी मिळविला आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या या बाजार समितीत सहमतीचे राजकीय पर्व सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.   

सटाणा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मंगला प्रवीण सोनवणे तर उपसभापतीपदी सरदारसिंग जावबा जाधव यांची काल गुरुवार (ता.२१) रोजी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चांदवडचे उपविभागीय अधिकारी संदीप भंडारे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समितीचे सचिव भास्कर तांबे व चंद्रकांत विघ्ने यांनी काम पाहिले. दरम्यान, सटाणा बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला सभापती होण्याचा बहुमान सौ.सोनवणे यांनी मिळविला आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या या बाजार समितीत सहमतीचे राजकीय पर्व सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.   

सटाणा बाजार समितीच्या विभाजनानंतर शासनाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात प्रथमच झालेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नवोदितांनी मुसंडी मारत प्रस्थापितांना पराभवाचा धक्का दिला होता. यानंतर सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. आज सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभापतीपदासाठी मंगला सोनवणे तर उपसभापती पदासाठी सरदारसिंग जाधव यांचे एकेकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भंडारे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवडीचे वृत्त सभागृहाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला. यावेळी निवडणूक अधिकारी श्री.भंडारे यांच्या हस्ते नवनिर्वाचीत सभापती मंगला सोनवणे व उपसभापती सरदारसिंग जाधव यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना सभापती सौ.सोनवणे म्हणाल्या, येत्या पाच वर्षात शेतकर्यांदसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणार असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच कटीबद्ध राहील. बाजार समितीचे प्रमुख घटक असलेल्या शेतकरी, व्यापारी, व हमाल - मापारी यांच्यात योग्य समन्वय साधणार असल्याचेही सौ. सोनवणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती सौ. सोनवणे व उपसभापती श्री. जाधव यांनी बाजार समिती आवारातील सहकारमहर्षी (कै.) दगा अजबा पाटील व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर सजविलेल्या जीपवरून  सौ. सोनवणे यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज मंदिरात सौ. सोनवणे यांनी दर्शन घेतले. यावेळी संचालक श्रीधर कोठावदे, जयप्रकाश सोनवणे, केशव मांडवडे, प्रकाश देवरे, वेणूबाई माळी, प्रभाकर रौंदळ, रत्नमाला सूर्यवंशी, सुनिता देवरे, संजय बिरारी, संजय सोनवणे, पंकज ठाकरे, मधुकर देवरे, संदीप साळे, नरेंद्र अहिरे, संजय देवरे, तुकाराम ठाकरे, प्रवीण सोनवणे, सुनील सोनवणे, प्रल्हाद पाटील, कुणाल सोनवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.प्रशांत सोनवणे, समीर पाटील, भिका सोनवणे, साहेबराव सोनवणे, रमेश सोनवणे, लखन पवार, चेतन सोनवणे, दि. शं. सोनवणे, अमर पाटील, प्रमोद सोनवणे, अभिजित सोनवणे, अजय सोनवणे, आनंद सोनवणे, पोपट चव्हाण आदींसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सटाणा बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला सभापती होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या मंगला सोनवणे यांना मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे सासरे व सेवानिवृत्त बांधकाम अभियंता (कै.) बळीराम सोनवणे यांनी निवृत्तीनंतर गेल्या पंधरा वर्षांपूर्वी सटाणा पालिकेच्या पहिल्यांदाच झालेल्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. मंगला सोनवणे या गेल्या दहा वर्षांपासून येथील ग्राहक संघाच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी संघाचे सभापतीपदही भूषविले. त्यांचे पती बांधकाम ठेकेदार प्रवीण सोनवणे यांचा असलेला जनसंपर्क त्यांना बाजार समिती निवडणुकीत व सभापतीपदाच्या निवडणुकीत उपयोगी पडला. 

Web Title: Women's Chairperson for the first time in the history of Satana Bazar Samiti