झळा दुष्काळाच्या : येवल्यात काम सुरू मात्र पारदर्शकतेचा अभाव

yevala
yevala

येवला : कायमच अवर्षणप्रवण असलेल्या दुष्काळी तालुक्यातत उन्हाळ्यात शेती काम नसल्याने अनेक हातांना रोजगार असतो. या दुष्काळाच्या स्थितीत तालुक्यात मनरेगाच्या कामांचा मोठा आधार ठरत असून मागील आठवड्यात तब्बल ७२ कामे सुरु होती. यावर १ हजार ३९३ मजूर काम करत होते. हा मजुरांच्या हातांना मोठा आधार असला तरी या योजनेतील मोठी गडबड सुरू असून मजुरांच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना मात्र आळा बसण्याची गरज आहे.

तालुक्यात अनेक भागात पावासाअभावी शेतीचे राखरांगोळी झाल्याने सद्यस्थितीत हजारो एकर शेतजमिनीत निव्वळ ठेकळ दिसत आहे. शेतकऱ्यांसह शेतमजूर देखील दिवसभर बिणकामाचे हात बांधून बसत असल्याने गरजूंना मोठा आधार योजनेचा मिळतोय. मागील आर्थिक वर्षात तालुक्यातून १२ हजार २३४ कामांची मागणी होती. त्यासाठी दोन लाख ९६ हजार ९४० मनुष्य दिवसही मंजूर झाले होते. त्यानुसार कामांनाही दुष्काळामुळे गती मिळाली. चालू आर्थिक वर्षात आता ८४३ कामांची मागणी असून यासाठी ११ हजार ५३७ मनुष्य दिवसही मंजूर झालेले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून कामांच्या बाबतीत अधिक प्रमाणात मागणी आहे. मात्र हे करताना अनेक ठिकाणी नोंदणीकृत मजूर दाखवून दुसऱ्याच मजूराकडून तसेच मशिनरीने काम होत असल्याच्या तक्रारी येत आहे. रस्त्याचे सर्वाधिक कामे तालुक्यात सुरू असून तब्बल ८१४ मजूर यावर काम करत आहे. याशिवाय विहीर पुनर्भरण, शौचालय, घरकुलांचे काम सुरू असल्याचे आकडेवारी सांगते.

मजुरांचे एटीएम अधिकारी- पुढाऱ्याकडे...
ही योजना म्हणजे खाऊचे घर झाल्याचे प्रकार समोर येत आहे. मुरमी येथे रस्ता काम न करताच सुमारे बारा लाखाचे बिले काढण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. ग्रामपंचायतचे पदाधिकारी व पंचायत समितीचे अधिकारी देखील मिलीभगत करून या कामांच्या बाबतीत गैरप्रकार करत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. कामावर मजूर वेगळे अन् निधी मात्र दुसऱ्याच्या नावावर काढला जातोय. किंबहुना काही अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी तर मजुरांचे एटीएम कार्ड काढून परस्पर बँकेतून पैसे काढत असल्याच्या तक्रारी वाढत असून याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी झाल्या. मात्र, चौकशीकडे कानाडोळा होत आहे. पंचायत समिती पासून ग्रामपंचायतीपर्यंत एकमेकांच्या सहयोगाने योजनेचा निधी सोयीने २५ ते ४० टक्यांपर्यंत वाटपाची चर्चा आहे. पारदर्शकता ठेवण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेऊन चौकशीसाठी पुढे येण्याची मागणी होत आहे. 

असे सुरू आहेत कामे..
कामाचे नाव          संख्या    कार्यरत मजूर 
रस्ता                       १४     ८१४   
विहीर पुनर्भरण          ११       ५३ 
वैयक्तिक विही             ७        ८२ 
गाळ काढणे                ८       २६९ 
वैयक्तीक शौचालय      १०         ६० 
घरकुल                     १५        ५१  
गाईंचा गोठा               ५         १९ 
राजीव गांधी भवन      १           ५ 
खेळाचे मैदान            १          ४० 
एकूण                     ७२       १३९३  

विखरणी येथे मनरेगातून सुरु असलेल्या रस्त्याच्या कामावार उपस्थित मजूर.

“मनरेगाची अनेक कामे सुरू आहेत हि समाधानाची बाब आहे. मात्र खऱ्या मजुरांना कामे मिळावीत व पारदर्शकपणे  कामे व्हावीत. या संदर्भात आलेल्या तक्रारींचीही चौकशी व्हावी तसेच कुठे गैरप्रकार होत असतील तर मजूर व पदाधिकाऱ्यांनी तक्रारी कराव्यात. पंचायत समितीने या तक्रारींची सोडवणूक न केल्यास वेळप्रसंगी आंदोलनही करू.”
- प्रवीण गायकवाड,सदस्य,पंचायत समिती येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com