VIDEO : बीपीसीएलचे खाजगीकरण थांबवा...कामगारांमध्ये तीव्र असंतोष

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

भारत पेट्रोलियम कंपनी तोट्यात चालत असल्याचे कारण पुढे करत केंद्र शासनाने बीपीसीएलचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या हजारो कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ मनमाड पासून जवळ असलेल्या पानेवाडी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी आज (ता.२८) पासून कामबंद आंदोलन सुरू केले. कामगारांनी प्रकल्पाच्या मुख्य गेट समोर ठिय्या आंदोलन केले. 

नाशिक : केंद्र शासनाने भारत पेट्रोलियम कंपनी विकण्यास काढल्यामुळे कंपनीच्या कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून याच्या निषेधार्थ मनमाड पासून जवळ असलेल्या पानेवाडी प्रकल्पातील कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे प्रकल्पातील कामकाज ठप्प झाले असून राज्यात टँकरद्वारे केला जाणारा इंधन पुरवठाही ठप्प झाला आहे. त्यामुळे अनेक पंपांवर इंधन टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हजारो कामगारांमध्ये असंतोष निर्माण

भारत पेट्रोलियम कंपनी तोट्यात चालत असल्याचे कारण पुढे करत केंद्र शासनाने बीपीसीएलचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या हजारो कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या निषेधार्थ मनमाड पासून जवळ असलेल्या पानेवाडी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी आज (ता.२८) पासून कामबंद आंदोलन सुरू केले कामगारांनी प्रकल्पाच्या मुख्य गेट समोर ठिय्या आंदोलन केले.

Image may contain: 9 people, people smiling

यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी मोदी सरकार मुर्दाबद, कामगार एकजुतीचा विजय असो, बंद करा बंद करा खाजगीकरण बंद करा आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला कामगारांच्या या आंदोलनामुळे  प्रकल्पातील कामकाज ठप्प झाले असून सुमारे चारशे पेक्षा जास्त टँकर माध्यमातून राज्यातील विविध भागातही केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे.  

पेट्रोल पंपांवर इंधन टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता

मनमाडपासून पाच किमी अंतरावर असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनी चे इंधन प्रकल्प असून या प्रकल्पातून रोज चारशे पेक्षा जास्त टँकरच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात पेट्रोल पंपांवर पेट्रोल डीझल चा पुरवठा केला जातो. शिवाय इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम च्या प्रकल्पांना देखील इंधम पुरवठा केला जातो मात्र कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे प्रकल्पातून केला जाणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे

Image may contain: 8 people, including Jeetendra Awhad, people smiling, child and outdoor

आंदोलन असेच सुरू राहिल्यास पेट्रोल पंपांवर इंधन टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे  भारत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात भगवंत शेळके, मनोहर सूर्यवंशी देविदास वाघ जुनेद शेख, सुनील गंभीर, शंकर भाबड, रफीख शेख, अर्जुन नगे, जयश्री बुणगे कुसुम सोमसे यांच्यासह सर्व कामगार उपस्थित होते. 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers agitation of Bharat Petroleum Company at manmad Nashik News Marathi News