
काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडल्याचे पालकांनी सांगितले. पालक जमील रंगरेज यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी अन्न व औषध सुरक्षा विभागास तक्रार केली. विभागाचे अधिकारी पी. एस. पाटील आणि के. एल. बाविस्कर यांनी त्वरित शाळेत पाहणी केली.
नाशिक : वडाळागाव येथील महापालिका शाळा क्रमांक 83 मध्ये सोमवारी (ता. 2) निकृष्ट अन्नपुरवठा झाला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह पालकांना तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. सेंट्रल किचनच्या ठेकेदारांकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ चालविल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेतून खिचडीचे नमुने ताब्यात घेतले.
वडाळागावातील महापालिका शाळेतील प्रकार...
वडाळागाव येथील महापालिका शाळा क्रमांक 83 मध्ये सोमवारी (ता. 2) दुर्गंध येत असलेल्या निकृष्ट खिचडीचा पुरवठा झाला. खिचडीतून दर्प येत असल्याची तक्रार विद्यार्थी तसेच शिक्षकांनी केली. एका विद्यार्थ्याने त्यांच्या पालकांना याबाबत माहिती दिली. पालकांनी शाळेत चौकशी केली असता शिक्षकांनीही त्यास सहमती दर्शविली. ती खिचडी विद्यार्थ्यांना वाटप करणे बंद केल्याचे सांगितले. काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडल्याचे पालकांनी सांगितले. पालक जमील रंगरेज यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी अन्न व औषध सुरक्षा विभागास तक्रार केली. विभागाचे अधिकारी पी. एस. पाटील आणि के. एल. बाविस्कर यांनी त्वरित शाळेत पाहणी केली.
चौकशीअंती महापालिकेकडून कारवाई
विद्यार्थी आणि पालकांशी चर्चा करून पुरवठा झालेल्या खिचडीचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. उर्वरित खिचडी शाळेच्या मोकळ्या जागेतील खड्ड्यात पुरून नष्ट केली. अधिकाऱ्यांनी या प्रकाराचा पंचनामा केला. शहरातील अन्य शाळांतही सेंट्रल किचनच्या माध्यमातून येत असलेले अन्न निकृष्ट असल्याच्या तक्रारीही वारंवार समोर आल्या आहेत. वेगवेगळ्या ठेकेदारांकडून शहराच्या विविध शाळांत मध्यान्ह भोजन पुरविले जाते. शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी पालकांनी केली.
हेही वाचा > प्रसुतींच्या कळांनी बिथरली होती 'ती'...त्यातच तिला दिसला 'तो'
वाचले का > उद्योजकाने 'त्याच्या'वर विश्वास ठेवला..अन् दिली गोपनीय माहिती..पण...
अन्न, औषध विभागाकडून नमुने ताब्यात
वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सोमवारी झालेल्या प्रकारची महापालिका तसेच शिक्षण विभागाने चौकशी करावी. भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. - जमील रंगरेज, पालक
शाळेच्या केंद्रप्रमुखांकडून माहिती मागविली आहे. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून आलेल्या चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. दोषी असणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांना सादर करणार आहे. - देवीदास महाजन, महापालिका शिक्षणाधिकारी \
वाचा सविस्तर > रिक्षाचालकांच्या 'कोणत्या' वागणुकीमुळे होतोय प्रवाशांचा संताप?