लाल मातीच्या आखाड्यातील पहिलवानाचा आवाज पोहोचला विधानपरिषदेत

संतोष विंचू 
शनिवार, 30 जून 2018

येवला : थ्री इडियटस चित्रपट पाहतांना एक डायलॉग मनात घर करून जातो... ‘काबील बनो काबील,कामयाबी तो साली झक मारके पीछे आयेगी..!’ हि शब्द रचना खरी होऊ शकते याचे उदाहरण पहायचे असेल तर येवल्याच्या दराडे कुटुंबाकडे पहा..प्रचंड मेहनत व जिद्दीच्या बळावर महत्वकांक्षा ठेऊन शून्यातून आपले अस्तित्व उभे करणाऱ्या या कुटुंबाने पुन्हा एकदा आपल्या एकीचे आणि जिद्दीचे उदाहरण संबध राज्यापुढे ठेवले आहे. एकाच घरात दोन आमदार अन तेही एका महिन्यातच...सहजपणे सोपे नसणारे हे गणित मात्र या परिवाराने जुळवले आहे...  

मे महिन्यात नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर नरेंद्र दराडे यांचा विजय तर जून मध्ये नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात कुस्तीचा आखाडा गाजवणारे पहिलवान किशोर दराडे यांचा विजय नक्कीच येवल्याच्या इतिहासात लिहिला गेला आहे. एकाच घरात दोन तर एकाच तालुक्यात तीन आमदार असण्याची कदाचित हि राज्यातील पहिलीच घटना असू शकते. कर्तुत्व,जिद्द आणि महत्वकांक्षा असल्यास उद्दिष्ट साध्य करणे सहजपणे शक्य आहे, हे किशोर दराडे यांनी दाखवून दिले आहे. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन देखील या सर्वसामान्य माणसाने आयुष्याचे जणू सोनेच केले आहे. कुस्ती खेळणारा पहिलवान, छोटा व्यावसायिक, शिक्षण संस्थाचालक ते शिक्षक आमदार असा त्यांचा प्रवास नक्कीच हेवा वाटावा असाच आहे. विशेष म्हणजे स्वतः राजकारणात नसतांना यापूर्वी  २५ वर्ष राजकारणातील मास्टरमाइंड म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या किशोर यांनी घरात अनेक पदे आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

किशोर दराडे यांच्या वाटचालीचा आढावा

१९८२ - कोल्हापूर येथे कृषी प्रशिक्षणासाठी रवाना
१९८५ - कुस्तीचा सराव करत पहिलवान म्हणून ख्याती
१९८७ - घरची परिस्थिती नाजूक असल्याने व्यवसायात लक्ष  
१९९९ - कै.रामकृष्ण मोरे यांच्या प्रेरणेने जगदंबा शिक्षण संस्थेची स्थापना
२००० - बाभूळगाव, रहाडी येथे माध्यमिक विद्यालयाची सुरुवात  
२००२ - येवल्यात कृषी पद्विका विद्यालयाची सुरुवात
२००४ - बाभूळगाव येथे तंत्रनिकेतनची सुरुवात
२००६ - बाभूळगाव येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची केली सुरुवात
२००८ - मातोश्री शिक्षण संस्थेची स्थापना करून एकलहरे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु
२०१२ - गोरगरिबांच्या मोफत शिक्षणासाठी विद्यार्थी दत्तक योजनेची सुरुवात
२०१४ - प्रथमच राजकारणात एन्ट्री करत जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
२०१४ - जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र दराडे यांच्या निवडीत सिंहाचा वाटा
२०१५ - रोजगार मेळावा आयोजन करून अनेक युवकांना दिला रोजगार
२००४,२००९ व २०१४ - विधानसभा निवडणुकीत आमदार छगन भुजबळ यांच्या विजयासाठी प्रयत्नशील
मे २०१८ - नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बंधू नरेंद्र दराडे यांच्या विजयात सिंहाचा वाटा
जून २०१८ - नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत एकतर्फी विजय

Web Title: Wrestler turned into Politician