धनदाईदेवीच्या यात्रोत्सवात कुस्ती स्पर्धेत खानदेशातील मल्लांचा सहभाग

दगाजी देवरे
गुरुवार, 29 मार्च 2018

सकाळच्या सत्रात सरपंच सतीश देवरे, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष हिम्मतराव देवरे, ग्रामपंचायत, तरुण ऐक्य मंडळ, ग्रामविकास मंडळ, विकास संस्थेच्या पदाधिका-यांच्या हस्ते प्रथम कुस्ती लावत उदघाटन झाले. ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य गंगाराम देवरे, एस. एन. देवरे, कुंदन देवरे, एस. डी. देवरे, दगाजी पाटील, दिलीप देवरे, बिपीन देवरे, संभाजी देवरे, गंगाराम गायकवाड, ओंकार माळीच,
प्रवीण देवरे, माधव देवरे, महेन्द्र देवरे, शशिकांत मोहिते, आरिफ पठाण उपस्थित होते.

धुळे (म्हसदी) : येथील धनदाईदेवीच्या यात्रोत्सवनिमित्त अमरावती नदीपात्रात दिवसभरात दोन सत्रांत सुमारे साडेचारशे कुस्त्या झाल्या.यांच्यात शेवटची कुस्ती चादीचा मुलामा असलेला गद्येवर झाली.विजयी मल्लांना ग्रामपंचायतीतर्फे साठ हजारांची तांबे, पितळ, अॅल्युमिनिअम, स्टीलची भांडी व सतर हजार रुपये रोख पारितोषिक म्हणून देण्यात आले. अनेकांनी रोख रक्कमेतून कुस्त्या लावल्या. पंधरा हजार रुपये किंमतीची चांदीचा मुलामा असलेली गदावर मनमाड (नाशिक) येथील धर्मा शिंदे व उडाणे (ता. धुळे)येथील सुनील पहेलवान यांच्यात झाली. पंधरा मिनिटांच्या कडव्या लढतीत सुनीलने बाजी मारली. दरवर्षी उडाणे येथील सुनील वेगळी चमक दाखवतो.

सकाळच्या सत्रात सरपंच सतीश देवरे, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष हिम्मतराव देवरे, ग्रामपंचायत, तरुण ऐक्य मंडळ, ग्रामविकास मंडळ, विकास संस्थेच्या पदाधिका-यांच्या हस्ते प्रथम कुस्ती लावत उदघाटन झाले. ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य गंगाराम देवरे, एस. एन. देवरे, कुंदन देवरे, एस. डी. देवरे, दगाजी पाटील, दिलीप देवरे, बिपीन देवरे, संभाजी देवरे, गंगाराम गायकवाड, ओंकार माळीच,
प्रवीण देवरे, माधव देवरे, महेन्द्र देवरे, शशिकांत मोहिते, आरिफ पठाण उपस्थित होते.

ग्रामपंचायतीसह काही दानशूरांनी रोख रक्कम म्हणून बक्षीस दिले. त्यात संजय देवरे व शेखर यांनी चांदीचा मुलामा असलेली गदा, गोटू साहेबराव मोहिते यांनी तीन हजार, मातोश्री व आदर्श इंग्लिश मेडीअम स्कूलकडून दोन हजार, ककाणीचे माजी सरपंच सचिन बेडसेकडून दोन हजार रुपये,काळगाव येथील डॉ. खैरनारकडून पाचशे रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आले. गेल्या वर्षापेक्षा यंदा मल्लांची संख्या अधिक होती .धुळे, नदुंरबार, नाशिक, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील मल्लांनी सहभाग घेतला. सर्वाधिक कुस्त्या नाशिक येथील बाळू बोडकेने जिंकल्या. नाशिकचा सुरज, उडाणेचा मोतीलाल, लोणखेडीचा विनोद, बोरीसचा योगेश, भारदेनगरचा पंकज, बोरीसचा जितेंद्र, इंदवेचा रविराज, बळसाण्याचा छोटू, म्हसदीचा शेखर, नाना, पिंटू, जायखेडचा अनिल, इंदुरचा विनयकुमार, शेवाड्याचा सोनू, चाळीस गांवचा संदिप आदींनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. शिक्षक एम. एच. देवरे, कुंदन देवरे, भय्या देवरे, जगदीश ह्याळीस आदींनी समालोचन केले. गंगाराम देवरे, महेन्द्र देवरे यांनी आभार मानले.

Web Title: wrestling compitition in Dhule