प्रेम प्रकरणातून निवडला जातो चुकीचा मार्ग 

श्रीकांत जोशी
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

वाढत्या प्रेमप्रकरणातुन मारामाऱ्या, चोऱ्या करणे असा चुकीच्या मार्ग परिस्थिती नुसार निवडला जात आहे.

भुसावळ - वाढत्या प्रेमप्रकरणातुन मारामाऱ्या, चोऱ्या करणे असा चुकीच्या मार्ग परिस्थिती नुसार निवडला जात आहे. शहरातील कमी वर्दळ असलेल्या भागात मुली तोंडाला रुमाल बांधून मुलांशी तासन्‌तास बोलत असतात. यात प्रेमभंग झाल्यास किंवा एकमेकांच्या कुटुंबातील विरोधातून मागील काळात अनेक वादाचे प्रसंग उद्भवल्याचे दिसून आले आहे. 

पौगंडावस्थेतील मुलांची प्रेमप्रकरणं हा आता नवीन विषय राहिलेला नसला तरी कमी वयाची मुलही यात सहभागी होत आहे. एकमेकांना मोबाईलच्या माध्यमातून भेटायची वेळ व ठिकाण निश्चित केले जाते. मग त्यासाठी महाविद्यालयाचे तास बुडविले जातात. मध्यंतरी शहरातील एका महाविद्यालयाने मोबाईल आणण्यावर बंदी आणली होती. गेटवर तपासणी व्हायची तेव्हा डब्यात मोबाईल टाकून आणल्याचाही प्रकार घडला होता. क्लासच्या नावाने घराबाहेर पडून एखाद्या गल्लीत तासन्‌तास गप्पा मारण्याची पुणे, मुंबई व नाशिककडची स्टाईल भुसावळला रुजत आहे. अनेक मुले आपल्या आईवडिलांशी खोटे बोलतात. घरची ऐपत नसताना मुलीस महागडे गिफ्ट देऊन प्रभावित करण्यासाठी प्रसंगी घरातच चोऱ्याही करतात. 

मुलींवर लक्ष द्यायला हवे 
प्रेम संबंधाला घरच्यांच्या विरोधात असतो. त्यामुळे पैशांसाठी किंवा एकमेकांना भेटण्यासाठी खोटं बोलणे, पैसे चोरणे, रागाने अपशब्द वापरणे याचा परिणाम गुन्हेगारीत होतो. मुलीचे वागणे बदललेले असते, ही गोष्ट तिच्या आईच्या लक्षात यायलाच हवी. संशय आल्याबरोबर ती कोठे जाते? कोणाला भेटते? तिचा मोबाईल चेक करणे या गोष्टी आईनं करायलाच हव्या. 
- व. पु. होले  लेखक व कथाकथनकार, सावदा. 

भुसावळ मधील विविध भागात प्रेमीयुगल गप्पा मारत उभे राहत असल्याचे दिसून येते. ही चिंतेची बाब असून, यातून अनेक वादाचे प्रसंग उद्‌भवतात. मुलांनी महाविद्यालयीन जीवनात आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे. तसेच आईवडिलांनी देखील आपल्या मुलामुलींवर योग्य संस्कार देऊन देण्याची गरज आहे. जेणेकरून मुले चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. 
- कपिल मेहता,  संचालक, गुजराती स्विटस, भुसावळ. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wrong way is being chosen from love affair

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: