पैठणीचे माहेरघर बस्त्यांसाठी चार जिल्ह्यात झाले फेमस!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

येवला : पैठणी येवला म्हणजे असे समीकरण सर्वश्रुत आहे...अर्थात येथे येणारा ग्राहकही पैठणीच्या प्रेमापोटीच खरेदीला येतो. मात्र यासोबतच मागील तीन-चार वर्षांपासून येथील साडीची बाजारपेठ आता लग्नाच्या बस्त्यासाठी लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हाच नव्हे तर शेजारील चार जिल्ह्यात देखील येथील साडी मार्केट फेमस होऊन बस्त्यासाठी वधू वर पित्यांना आकृष्ट करत असल्याने कोट्यावधीची उलाढाल येथे वाढली आहे.

येवला : पैठणी येवला म्हणजे असे समीकरण सर्वश्रुत आहे...अर्थात येथे येणारा ग्राहकही पैठणीच्या प्रेमापोटीच खरेदीला येतो. मात्र यासोबतच मागील तीन-चार वर्षांपासून येथील साडीची बाजारपेठ आता लग्नाच्या बस्त्यासाठी लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हाच नव्हे तर शेजारील चार जिल्ह्यात देखील येथील साडी मार्केट फेमस होऊन बस्त्यासाठी वधू वर पित्यांना आकृष्ट करत असल्याने कोट्यावधीची उलाढाल येथे वाढली आहे.

रुबाब झळकवणारी येवल्याची पैठणी देशभरात प्रसिद्ध आहे नव्हे तर थेट लंडनहून देखील या पैठणीचा मोहापायी महिलांची पावले या गावाकडे वळत आहेत. शनिवार व रविवार म्हणजे तर पुणे, मुंबईपासून राज्यातील विविध ग्राहकांच्या गर्दीने येवल्यातील पैठणी दुकाने हाऊसफुल्ल होऊ लागली आहेत. त्यातच मागील एक ते दीड महिन्यांपासून शहरातील पैठणीचेच नव्हे तर साड्यांचे सर्व दुकाने लग्नाच्या खरेदीच्या गर्दीने फुलली होती.

यावर्षी अस्त असल्याने १२ मेनंतर लग्नाच्या तारखा नसल्याने त्यापूर्वीच्या तिथी असलेल्या तारखांना विक्रमी संख्येने लग्न आहेत. त्यासाठीची खरेदी मागील महिनाभरापासून सुरू आहे. विशेष म्हणजे या लग्नसराईत केवळ कपडे खरेदीत पाच ते सात कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

लग्नकार्यात बस्त्याचा थाट व महत्व अप्रूप आहेत. नवरा-नवरीच्या कपडय़ांसोबतच मानापानाच्या, नातेवाइकांच्या कपडय़ांची खरेदीही अत्यावश्यकच असते. कपडे हा खरंतर वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय पण तो बस्त्यात सर्वानुमते निवडला जातो. या आगळ्यावेगळया असणाऱ्या लग्नाच्या बस्त्याची बाजारपेठ येथे तशी पूर्वीपासूनच आहे. मात्र पैठणीचे असंख्य शोरूम झाल्यापासून आणि त्यातही पैठणीसह सेमी पैठ्णीसह फुअर, दागिना, पेशवाई, कांजीवरम सिल्क, बंगलोर सिल्क, जरीकाठ, रेशमी सिल्क, कॉटन, इरकल, धर्मावरम आदि सर्व प्रकारच्या साड्या अधिक व्हरायटी व प्रकारांत येथे मिळू लागल्याने येथे बस्त्याला येणाऱ्यांची संख्या विक्रमीरित्या वाढत आहे.फक्त नाशिक जिल्ह्यातच  नव्हे तर नगर,औरंगाबाद या जिल्ह्य़ातील आजूबाजूच्या तालुक्यातील वधुवरांचे बस्ते देखील येथील दुकानातच होऊ लागले आहेत. किंबहुना गर्दीच्या काळात तर या दुकानात नंबर लागल्याचेही चित्र अनुभवयास मिळाले आहे.

येथे पारख,रंगोली,मनोकामना,हाबडे,छाजेड,भांबारे,भावसार आदि दुकाने पूर्वीपासून बस्त्यांसाठी लोकप्रिय आहेतच.मात्र आता यात कापसे पैठणी,सोनी पैठणी,भांडगे पैठणी आदी नामांकित शोरूमचे देखील नाव लोकप्रियतेच्या यादीत येऊ लागले आहे.या वर्षी तर एका दुकानांत दिवसात १० ते २५ च्या वर बस्ते बांधले गेल्याचेही सांगितले जात आहे.

खरे तर येवल्याचे नाव पैठणीसाठी लोकप्रिय आहे.मात्र लग्नामध्ये नवरी मुलगी घागरा,दुल्हन साडी किंवा शालूच परिधान करते.पैठणीला नवरीच्या हिशोबाने दुय्यम स्थान असते मात्र वधुवरांच्या घरातील महिलांसाठी पैठणी ही प्राधान्यक्रमाची खरेदी असते.हा सर्व विचार करून येथील विक्रेत्यांनी नवरीच्या एक से बढकर एक प्रकारच्या साड्या देखील पैठणी सोबतच दुकानात विक्रीला ठेवल्या आहेत.कापसे पैठणीने तर शेजारीच रेमंड या कंपनीचे शूटिंग शर्टिंगचे शोरूम सुरु केले असून यामुळे नवरा नवरीची खरेदी एकाच ठिकाणी होऊ लागली आहे.

“लग्नाच्या खरेदीला येणाऱ्या ग्राहकांकडून पैठणी व तत्सम साड्याना अधिक मागणी असते.यामुळे आम्ही सर्व प्रकारच्या पैठणीसह शोरूममध्ये ग्राहकांकडून मागणी होणाऱ्या साड्या विक्रीला ठेवल्या आहेत.विशेष म्हणजे याची दालने वेगवेगळी केलेली आहेत.याचमुळे ग्राहकांची संख्या वाढली असून बस्त्यासाठी विक्रमी गर्दी झाल्याचे चित्र यंदा होते.यामुळे बस्त्याची उत्तम सुविधा उपलब्ध केली आहे.
- दिलीपदाजी खोकले,संचालक,कापसे पैठणी

"लग्नाच्या हंगामात येणारा ग्राहक पैठणीसह इतर सर्वच साड्या मागत असतो. ग्राहकांची ही मागणी एका छताखाली पूर्ण व्हावी यासाठी आमच्या दालनात बस्त्याची देखील सोय आम्ही केली आहे. लग्नाच्या वेळी ग्राहकांकडून मिळणारा जोरदार प्रतिसादामुळे येथील बाजारपेठ अधिक लोकप्रिय होऊ लागली आहे.”
- निशांत सोनी,संचालक,सोनी पैठणी

Web Title: Yeola becoming famous for wedding shopping