येवला: दोन दिवसात जिल्ह्यात बीटी बियाणे उपलब्ध

cotton
cotton

येवला - कपाशीवर होणाऱ्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने १८१ दिवसांत येणाऱ्या कपाशीच्या बीटी बियाणांचा वापर करावा असे सुचविले आहे. त्यानुसार येत्या खरीप हंगामासाठी राज्यात ४२ कंपन्यांच्या ३७० वाणांनाच विक्री करण्याची परवानगी कृषी विभागाने दिली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसानंतर शेतकर्यांना बियाणे उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

जिल्ह्यात येव्ल्यासह मालेगाव व नांदगाव मध्ये नगदी पीक म्हणून शेतकरी त्याकडे पाहतात. मात्र मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने कपाशीचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले. आता जूनपासून खरीप हंगाम सुरू होणार आहे. अनेकांनी तर आगाद कपाशी लागवडीची तयारी केली आहे. त्यामुळे कृषी विभागाने बियाण्याचे धोरण निच्छित केले आहे. कपाशीच्या मूळ कंपन्यांसह विपणन कराराद्वारे इतर कंपन्या देखील कपाशी बियाणे विक्री करत होत्या. अशा सर्व प्रकारचे मूळ कंपनीच्या ४०२ वानांची मागील वर्षी ६२४ वेगवेगळय़ा नावाने विक्री सुरू होती. यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन फसवणुकीची शक्यता होती. त्यामुळे येत्या खरीप हंगामापासून जीईएसीने मंजूर केलेल्या नावानेच बीटी कपाशी बियाणे विक्री करण्याचे कृषी विभागाने निश्चित केले आहे.

बीटी कापसावर मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादनात विक्रमी घट आणली. या गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने १८० दिवसांपेक्षा जास्त दिवसाचे वाण वापरू नये अशी शिफारस केली आहे. त्यामुळे कमी व मध्यम कालावधीच्या वाहनांना मंजुरी देताना १८० दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या वाणांस मंजुरी दिलेली नाही. या वाणांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वेबसाइटवर मिळणार आहे. तसेच राज्यात विक्रीस बंदी घालण्यात आलेल्या राशी ६५९ या बीटी बियाण्यास विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. पाकिटावरील कोड स्क्रॅच करून एसएमएस केल्यास कंपनीकडून लागलीच रिप्लाय देऊन बियाणे खरे आहे की बनावट याबाबतच्या खात्रीचा संदेश पाठविण्यात येणार आहे.

तर करा तक्रार...शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांनी शासनाने मान्यता दिलेल्या कपाशीच्या तीनशे सत्तर वाणांचे बियाणे वापरावे. याव्यतिरिक्त कुठे विक्री होत असल्यास पंचायत समिती किंवा कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. शेती आहे त्यांच्या नावानेच बिल घ्यावे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांनी केले आहे.

या कंपन्याना मिळाली परवानगी....
अंकुर, पालमूर, अजित, जे.के., राशी, यशोदा, सनग्रो, नाथ, धनलक्ष्मी, वेस्टर्न, न्युजीविडू, प्रभात, प्रवर्धन, तुलशी, कावेरी, कृषिधन, विभा, बायर, कावेरी, नर्मदा, जुआरी, कोहिनूर, गंगा कावेरी, कलश, जुआरी,सिडवर्क, महाराष्ट्र, ग्रीनगोल्ड, नवकार आदी

''बीटी कापसाच्या बियाण्यांना मर्यादित वाणाला परवानगी मिळाली असून यामुळे शेतकऱ्यांची होणारा गोंधळ व फसवणुकीची भीती कमी झाली आहे. २३ मे पासून बीटी बियाणे मिळेल असे सांगण्यात आले आहे. मात्र पुढील आठवड्यापासून बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकेल. यावेळी किमत ७४० रुपये असणार आहे''.
- नितीन काबरा, संचालक, द्वारका एजन्सी, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com