मातोश्रीच्या ८५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतुन निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

येवला- धानोरा येथील मातोश्री एज्युकेशन संचालित मातोश्री तंत्रनिकेतनमध्ये झालेल्या कॅम्पस मुलाखतीत ८५ विद्यार्थ्यांची नोकरीकरिता निवड करण्यात आली. अंतिम वर्षातिल मेकॅनिकल, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या शाखेतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेच्या आधारे पुणे येथील इटोन इंडस्ट्रीजने २०, चाकण येथील शारदा मोटर्सने २३ तर व्हेरॉक इंडस्ट्रीजने ४२ विद्यार्थ्यांची निवड करुन नोकरीची संधी दिली.

मातोश्रीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी दरवर्षी आपल्या कामातील मेहनत तसेच गुणवत्तेच्या आधारावर विविध कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिलावली आहे. त्यामुळेच मातोश्री तंत्रनिकेतनला मुलाखतीत कंपन्यांकडुन प्राधान्य दिले जाते.

महाविद्यालयातील १५० हुन अधिक विद्यार्थ्यानी मुलाखतीत सहभाग नोंदवला त्यापैकी ८५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

इटोन इंडस्ट्रीजचे एचआर व्यवस्थापक भारत वेदपाठक, शारदा मोटर्सचे महादेव पाटिल, व्हेरॉक इंडस्ट्रीजचे रोहन उकरांडे यांनी आपल्या कंपनी बद्दल माहिती देत विद्यार्थ्याना कामाचे स्वरूप समजावले. तसेच विद्यार्थ्याना कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधानबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा व मुलाखती घेण्यात आल्या.

निवड झालेले सर्व विद्यार्थी १५ मे पासुन रुजू होणार आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्ष किशोर दराड़े ,सचिव कुणाल दराड़े, प्राचार्य गीतेश गुजराथी, विभागप्रमुख बाळासाहेब तांबे, यशवंत हीरे, सोमनाथ गाड़े, संदीप कोल्हे, अतुल रामकर यांनी अभिनंदन केले. मुलाखातीचे नियोजन ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी दत्तात्रय शिंदे, नितिन गुजर, योगेश खैरनार, होन यानी केले.

"महाविद्यालयाने अंतिम वर्षात शिकत असलेल्या ८५ विद्यार्थ्याना जागतिक स्तरावर काम करणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली. दरवर्षी १०० टक्के विद्यार्थ्याना रोजगार मिळविण्याकरिता आम्ही प्रयत्नशील असतो "
श्री किशोर दराडे, अध्यक्ष, मातोश्री शिक्षण संस्था, येवला

Web Title: yeola engineering students campus placement