अवघ्या तीन वर्षातच येवला औद्योगिक सहकारी वसाहतीची पुन्हा निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

येवला : राजकीय खलबते व गटबाजी यामुळे मागील पाच-सहा वर्षांपासून लक्षवेधी बनलेल्या अंगणगाव येथील येवले औद्योगिक सहकारी वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे केवळ तीन वर्षाच्या कार्यकाळातच निवडणूक होत असून, सहा महिन्यांपासून असलेली प्रशासकीय राजवट देखील संपुष्टात आणत ३ जून रोजी मतदान होणार आहे. याच दिवशी लगेचच मतमोजणी करण्यात येणार आहे. 

येवला : राजकीय खलबते व गटबाजी यामुळे मागील पाच-सहा वर्षांपासून लक्षवेधी बनलेल्या अंगणगाव येथील येवले औद्योगिक सहकारी वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे केवळ तीन वर्षाच्या कार्यकाळातच निवडणूक होत असून, सहा महिन्यांपासून असलेली प्रशासकीय राजवट देखील संपुष्टात आणत ३ जून रोजी मतदान होणार आहे. याच दिवशी लगेचच मतमोजणी करण्यात येणार आहे. 

तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घातल्याने २०१५ मध्ये वसाहतीची पंचवार्षीक निवडणुक चांगलीच चर्चेत आली होती.त्यावेळी १३ पैकी १२ जागांची निवडणूक बिनविरोध झाली तर भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एका जागेसाठी निवडणुक होऊन त्यावेळी मतदान घेण्यात आले होते. वसाहतीच्या अध्यक्षपदी शाम कंदलकर तर उपाध्यक्षपदावर रचना अजय जैन यांची संचालक मंडळाने बिनविरोध निवड केली होती. मात्र, ८ संचालकांनी त्यांच्या विरोधात सहकार विभागाकडे तक्रार केली होती.यावरून चौकशी अंती संपूर्ण संचालक मंडळ अडीच वर्षांच्या कालावधीनंतर बरखास्त करण्यात आले होते.यानंतर चौकशी अधिकारी डी. व्ही. पाटील यांचीच औद्योगिक वसाहतीवर प्रशासक म्हणून नेमणुक केली होती.चौकशीत त्रृटी ठेवल्याने अवघ्या दोन महिन्यातच  पाटील यांची उचलबांगडी करत प्रशासक म्हणून बोरसे यांची सहकार विभागाने नेमणूक केली.आता निवडणुक जाहीर झाल्याने प्रशासकीय कारकिर्द संपल्यात जमा आहे.

औद्योगिक सहकारी वसाहतीसाठी २४ एप्रिलरोजी मतदार यादी प्रसिद्धी करण्यात आली असून यावर हरकती व सुचना २७ पर्यंत मागविण्यात येणार आहे.या हरकतींवर ३ मे रोजी सुनावणी तर ४ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ५ ते १० मे दरम्यान नामनिर्देशनपत्र विक्री व स्विकृती तर १० मे रोजी नामनिर्देशनपत्राची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.११ मे रोजी नामनिर्देशनत्राची छाननी,१४ रोजी वैध नामनिर्देशनत्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे.दि. २९ मे पर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. अंतिम उमेदवार यादी दि. २९ मे रोजी प्रसिद्धी करण्यात येणार असून यानंतर उमेदवारंना निशाणी वाटप करण्यात येणार आहे.तर ३ जून रोजी मतदान होणार आहे.सहाय्यक सहकार अधिकारी योगेश उगलमुगले निवडणुक निर्णय अधिकारी आहेत.हि निवडणूक जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांच्या अपेक्षांना घुमारे फुटले असून यावेळी भुजबळ नसल्याने निवडणुकीत रंग भरला जाणार आहे, हे नक्की!!

Web Title: Yeola Industrial Co operative Colony Re election only in just three years