ग्रामीण भागात ए 2 दूध प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध करण्याची गरज

cow
cow

येवला - सगळेचजण आता आरोग्याविषयी सजग झाले आहे. दवाखान्यावर भरखर्च करण्यापेक्षा देशी ए २ दुधाला प्राधान्य दिले जात आहे. ए २ दुधाची प्रमाणीकरण करण्यासाठीची यंत्रणा दुग्ध मंत्रालयाने गावोगावी उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केले.

निमगाव मढ येथे जिल्हा परिषद सेस अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संकरित जनावरांविषयी जागृती कार्यक्रमात सोनवणे बोलत होते. यावेळी कार्यक्रमात सुदृढ, शसक्त व देखणे संकरित वासरांची स्पर्धाही झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले होते.

देशी गायींच्या दुधात मधुमेह, हृदयरोग, मेंदूचे विकार यावर मात करू शकणारे घटक नैसर्गिक असतात. हे दुध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. देशी गाई मध्ये गीर, थारपारकर, देवनी आदी गोवंश शुद्ध स्वरूपात संगोपन करणे आवश्यक आहे. यासाठी शासनस्तरावरुन मदत झाली पाहिजे, असेही सोनवणे म्हणाले.

पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी सांगितले की, शासनाचे 100 रुपये आले तर 90 रुपये आदिवासी भागात जातात अन फक्त 10 रुपये आमच्या भागात येतात. अधिकार्‍यांनी येथील शेतकर्‍यांना लाभ द्यावा. दूध उत्पादन करतो तो गरीबच राहतो, मात्र डेर्‍या चालवणारे श्रीमंत होतात, असे सांगितले.

यावेळी कारभारी लभडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. चित्ते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णु गर्जे, येवला पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय नाशिककर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पंचायत समिती सभापती आशाताई साळवे, जिल्हा परिषद सदस्य सविता पवार, पंचायत समिती सदस्य नवनाथ काळे, सरपंच मनीषा लभडे, नवनाथ लभडे, ग्रामसेवक महाले, चेअरमन किशोर लभडे, पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी लभडे, रावसाहेब लभडे, जनार्दन दिवटे,बाळू दिवटे, मच्छीन्द्र मोरे, नितीन लभडे, बाळासाहेब बोराडे आदी उपस्थित होते. यावेळी संकरित वासरांचे क्रमांक काढण्यात येउन त्या शेतकर्‍यांना पारितोषिके देण्यात आली. त्यात ० ते ६ वयोगटातील वासरांसाठी प्रथम कैलास लभडे, द्वितीय चंद्रकांत दिवटे, तृतीय उल्हास दिवटे तर ६ ते १२ वयोगटातील वासरांसाठी प्रथम जनार्धन दिवटे, द्वितीय अशोक बोराडे, तृतीय बाबासाहेब लभडे तर १२ महिनेच्या वरील वयोगटातील वासरांसाठी प्रथम संजय मोरे, व्दितीय सुनील लभडे, तृतीय भानुदास लभडे यांना तर उत्कृष्ठ गायीचे पारतोषिक अशोक बोराडे यांना देण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. प्रताप अनंथ्रे यांनी केले तर आभार डॉ. प्रदीप दाणे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com