ग्रामसेवकांची तीन वर्षांची सेवा ग्राह्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

येवला - राज्यातील ग्रामसेवक अनेक वर्षांपासून करत असलेली मागणी ग्रामविकास विभागाने अखेर मान्य केली आहे. 2005 पासून कंत्राटी ग्रामसेवकांनी केलेल्या तीन वर्षांचा सेवा कालावधी अर्हताकारी सेवा म्हणून गृहीत धरली जाणार आहे. यामुळे बारा वर्षांनंतर मिळणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीसह वेतनश्रेणीसाठी ग्रामसेवकांना याचा फायदा होणार आहे.

राज्य ग्रामसेवक संघटनेने अनेक आंदोलनासह वारंवार ही मागणी केली होती. अखेर ग्रामविकास विभागाने हिरवा कंदील दाखवत बुधवारी पत्रक प्रसिद्ध केल्याने राज्य ग्रामसेवक संघटनेच्या प्रलंबित मागणीला यश आले आहे. या निर्णयाचा फायदा 2005 नंतर सेवेत आलेल्या सुमारे सात हजारावर ग्रामसेवकांना होणार आहे. 31 मे 2000 च्या शासन निर्णयानुसार डिसेंबर 2005 पासून राज्यामध्ये ग्रामसेवकांच्या सरळ सेवेने नियुक्तीवेळी पहिली तीन वर्षे कंत्राटी पद्धतीने ठोक मानधनावर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तर एप्रिल 2006 पासून हा तीन वर्षांचा कालावधी सेवानिवृत्ती व सेवा निवृत्ती विषयक इतर लाभासाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पहिले तीन वर्षे ग्रामसेवक कंत्राटी पद्धतीने ठोक मानधनावर काम करत आहेत. या दरम्यानचा कालावधी बारा वर्षांनंतर देण्यात येणारी कालबद्ध पदोन्नती आणि 24 वर्षानंतर देण्यात येणारी आश्वासित प्रगती योजनेतील वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत ग्राह्य धरला जात नव्हता. परिणामी ग्रामसेवकांना या योजनांचा लाभ तीन वर्षे उशिरा मिळत होता.

Web Title: yeola news gramsevak service