येवल्यात दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा शिल्लक
येवला - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला सर्वोच्च असा दोन हजार ७०० रुपये भाव मिळाला. भावातील वाढीमुळे आवकेतही वाढ होऊन रोज दहा ते बारा हजार क्विंटल कांदा विक्रीला येत आहे. मात्र भावात अजून उसळी होऊन तीन हजाराचा टप्पा गाठण्याच्या अंदाजानुसार अनेकांनी चाळीतून कांदा बाहेर काढलेला नसून दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा तालुक्यात शिल्लक आहे.
येवला - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला सर्वोच्च असा दोन हजार ७०० रुपये भाव मिळाला. भावातील वाढीमुळे आवकेतही वाढ होऊन रोज दहा ते बारा हजार क्विंटल कांदा विक्रीला येत आहे. मात्र भावात अजून उसळी होऊन तीन हजाराचा टप्पा गाठण्याच्या अंदाजानुसार अनेकांनी चाळीतून कांदा बाहेर काढलेला नसून दोन ते अडीच लाख क्विंटल कांदा तालुक्यात शिल्लक आहे.
पावसाअभावी खरिपाच्या पिकाने वाट लावली असून याची तूट लाल काद्यातून भरून निघण्याची शाश्वतीही मावळली आहे.त्यातच चाळीतला कांदा भाववाढीच्या प्रतीक्षेत इतके दिवस चाळीतच गुदमरत आहे. दोन दिवसांपासून या कांद्याचे दर इतर राज्यांसह देशावर मागणी वाढल्याने तेजीत आले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असल्याचे चित्र आहे.तथापी चाळीत कांदा खराब लागल्याने सुमारे ७५ टक्के कांदा शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने विक्री केलेले आहेत.आता वीस ते पंचीस टक्के म्हणजेच दोन ते अडीच लाखांच्या आसपास उन्हाळ कांदा शिल्लक असून त्याला बाजाराची वाट शेतकरी दाखवू लागले आहे. भाव वाढले तरी अजूही देशातील बाजाराची माहिती घेऊन शेतकरी भावातील तेजीच्या प्रतीक्षेत कांदा विक्रीला काढत नसल्याचेही चित्र दिसतेय.
येवल्यात भावात उसळी
येथील बाजार समितीत आज उन्हाळ कांदा ५०० ते २७०० तर सरासरी २१०० रुपये दराने विक्री झाला.सकाळी भावात तेजी होती,दुपारून भाव स्थिर राहिले. येथ २१७ ट्रॅक्टर व ९५ रिक्षा,पिकअप मधून कांदे विक्रीला आले. उपबाजार अंदरसुल येथेही ३०० ते २७०० तर सरासरी १९५० रुपयांचा भाव मिळाला.६० ट्रॅक्टर व १७० रिक्षा आवक होती.या दोन्ही ठिकाणी सुमारे १२ हजार क्विंटल आज झाली.
आठवड्यात ५० हजार क्विंटल
येथील बाजार समितीत दिवसाला १० ते १२ तर आठवड्याला ४५ ते ५५ हजार क्विंटल उन्हाळ कांदा विक्रीला येत आहे.चाळीत दर्जेदार कांदे असलेले शेतकरी देशावरील अंदाज घेऊन अजूनही भाव वाढतील या अपेक्षेने विक्रीला काढत नसल्याचे चित्र आहे.येथे अद्याप लाल कांदा विक्रीला आलेला नाही.
“या आठवड्यात भावात रोजच वाढ होत आहे.देशावरील मागणी वाढली असून लाल कांदा येण्याला अवधी असल्याने भावातील तेजी कायम राहू शकते.१५-२० नोव्हेंबर पर्यत उन्हाळ कांदा आवक राहील.लाल कांद्याला देखील भाव टिकून राहण्याची चिन्हे आहेत.”
-कैलास व्यापारे,सचिव,बाजार समिती
असे वाढत गेले भाव...
दि.१० - १०१६
दि.११ - १३००
दि.१२ - १४४८
दि.१३ - १४६८
दि.१५ - १८९५
दि.१६ - २३३२
दि.१७ - २७००