हुतात्मा भदाणेंच्या वारसांना 99 लाख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

धुळे - खलाणे (ता. शिंदखेडा) येथील हुतात्मा जवान योगेश भदाणे यांच्या वारसांना एक कोटी रुपयांचे साह्य मिळवून देईन, असे धादांत खोटे आश्‍वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्याचा आरोप भाजप आमदार अनिल गोटे यांनी केला होता. तो तद्दन खोटा, निराधार आणि केवळ भामरेंच्या व्यक्तिद्वेषानेच पछाडलेला असल्याचे मंत्री भामरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्यांनी शहीद भदाणेंच्या वारसांना मेअखेरपर्यंत 99 लाखांची रक्कम अदा झाल्याचे कागदपत्रांच्या पुराव्यानिशी स्पष्ट केले.
Web Title: yogesh bhadane heir 99 lakh rupees