PHOTO : तळमळत होता..झुंज देत होता चिमुकला चेंबरमध्ये...पण शेवटी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

वडाळागाव येथील सादिकनगरमध्ये राहणारा अजीम जुबरे खान (वय 7) बुधवारी सकाळी आठच्या सुमारास खेळत होता. खेळता-खेळता त्याचा पाय उघड्या चेंबरमध्ये गेला. चिमुकला चेंबरखाली जात असताना त्याने बचावासाठी चेंबरच्या कठड्यास धरत आरडाओरड केली. परिसरातील महिला त्या ठिकाणी धावत आली.

नाशिक : वडाळागाव येथील सादिकनगरमध्ये महापालिकेच्या चेंबरमध्ये बुधवारी (ता. 27) पडून जखमी झालेल्या सात वर्षीय चिमुकल्याची मृत्यूशी झुंज गुरुवारी (ता. 28) अपयशी ठरली. अजीम जुबेर खान असे चिमुकल्याचे नाव आहे. त्यामुळे उघड्या चेंबरचा मुद्दा ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. चिमुकल्याच्या मृत्यूस जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी केलेल्या अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

सादिकनगरमधील नागरिक संतप्त; महापालिका, नगरसेवकांचा काणाडोळा 

वडाळागाव येथील सादिकनगरमध्ये राहणारा अजीम जुबरे खान (वय 7) बुधवारी सकाळी आठच्या सुमारास खेळत होता. खेळता-खेळता त्याचा पाय उघड्या चेंबरमध्ये गेला. चिमुकला चेंबरखाली जात असताना त्याने बचावासाठी चेंबरच्या कठड्यास धरत आरडाओरड केली. परिसरातील महिला त्या ठिकाणी धावत आली. इतरांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. चेंबरमध्ये पडल्याने त्याच्या डोक्‍याला जोरदार मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. डोक्‍यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 29) त्याचा दफनविधी करण्यात आला. इतकी मोठी घटना घडूनही प्रभागाचे नगरसेवक किंवा महापालिका अधिकारी घटनास्थळी पोचले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी निषेध व्यक्त केला. संबंधित चेंबर घाणीने पूर्णपणे भरलेला असल्याने त्याचा अंदाज येत नाही. काही दिवसांपूर्वी याच चेंबरमध्ये एका फेरीवाल्याचा पाय जाऊन तो जखमी झाला होता. अशा प्रकारचे तीन ते चार उघडे चेंबर या भागात आहेत. महापालिकेस वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

Image may contain: one or more people

नागरिकांकडून आवरण 
घटनेनंतरही नगरसेवक किंवा महापालिका अधिकारी न आल्याने परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत अपघातग्रस्त चेंबरच्या आजूबाजूला सिमेंटचे खांब टाकून कपडा टाकला. महापालिकेने असे चेंबर त्वरित बंद करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली. 

Image may contain: 1 person, standing

चेंबरमध्ये पडलेल्या अजीमची झुंज अपयशी 
महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे चिमुकल्यास प्राण गमावावा लागला. त्याला भरपाई मिळावी. घटनेची माहिती मिळूनही अधिकारी किंवा नगरसेवक आले नाहीक, याचे दुःख वाटते. - लाला शहा, सामाजिक कार्यकर्ता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy Death in the chamber at Nashik News Marathi News