नवरी नटत असताना 'तो' शिरला वधू कक्षात....अन् मग...

संतोष घोडेराव : सकाळ वृतसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

दुपारच्या शुभ मुहूर्तावर अंदरसुल येथील व्यावसायिक राजेंद्र लिंगायत यांची कन्या कल्याणीचा शुभविवाह लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी दुपारच्या सुमारास नवदाम्पत्य गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची लगीन घाईची लगबग सुरू असतांना  नववधुचा वधुकक्षात शृंगार चालू असताना शुभमंगल होण्याच्या काही वेळा आधीच आठ ते दहा वर्षाच्या एका संशयित तरुणाने वधु कक्षात प्रवेश करून सुमारे साडे  तोळ्याचे दागिने असलेली पर्स घेऊन पोबारा केल्याने उपस्थित नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली.

नाशिक : अंदरसूल येथे लग्न सोहळ्याची धाम धूम सुरू होती...वधु बोहल्यावर जाण्याची तयारी करत होती...  त्यावेळी लॉन्स मधील वधु कक्षात एक अज्ञात व्यक्ती शिरतो..आणि सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स घेऊन पोबारा करतो.. या खळबळजनक घटनेमुळे  सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

एका संशयित तरुणाने वधु कक्षात केला प्रवेश 

याबाबत सविस्तर वृत्त असे की बुधवारी (ता.२०) दुपारच्या शुभ मुहूर्तावर अंदरसुल येथील व्यावसायिक राजेंद्र लिंगायत यांची कन्या कल्याणीचा शुभविवाह लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी दुपारच्या सुमारास नवदाम्पत्य गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची लगीन घाईची लगबग सुरू असतांना  नववधुचा वधुकक्षात शृंगार चालू असताना शुभमंगल होण्याच्या काही वेळा आधीच आठ ते दहा वर्षाच्या एका संशयित तरुणाने वधु कक्षात प्रवेश करून सुमारे साडे  तोळ्याचे दागिने असलेली पर्स घेऊन पोबारा केल्याने उपस्थित नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली.

No photo description available.
फोटो : मंगल कार्यालयाततील सीसीटीव्ही फुटेजमध्ये वधू कशातून पर्स घेऊन जातांना मुलगा

वधूचे पाच तोळे सोन्याचे दागिने चोरल्याने खळबळ 

अशाप्रकारे धाडशी चोरी लॉन्स सुरू झाल्या पासून पहिल्यांदाच झाल्याने या घटनेची माहिती येथील लक्ष्मीनारायण लॉन्स मालक दीपक एंडईत यांनी पोलीस कर्मचारी कांदळकर यांना दिली. लॉन्स मधील सी सी टीव्ही फुटेज तपासले असता दागिन्यांची पर्स लाबवितांना लहान बालक आढळत असून या बालकास अंदरसुल येथील वधुपक्ष तसेच अहमदनगर येथील वर पक्षातील प्रमुख नातलगांनी ओळखत नसल्याचे सांगितले आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती वधुपिता राजेंद्र लिंगायत यांनी दिली .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young boy stole bride,s gold jewelry at Nashik Crime News