तरूण शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मालेगाव : नगदी पीक असलेल्या कापूस पिकावरील बोंडअळीने बसलेला फटका. कर्जाचा डोंगर, एकत्रित कुटुंबाची होत असलेली ओढाताण पाहून भुषण दगा ठोके (वय 28) या तरूण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे हा प्रकार घडला. याबद्दल नांदगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

दगा ठोके यांचे एकत्रित कुटुंब. सात एकर शेतीत उत्पन्न नसताना कुटुंबाची मोठी अडचण होत होती. त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे तीन लाखाहून अधिक पीक कर्ज होते. कापूस व कांद्याने दगा दिला. शेतातील विहिरीचे पाणी आटल्याने पंचाईत झाली. कर्जाचा डोंगर व बिकट स्थिती यातुनच भुषणने आत्महत्या केली. त्याच्या पाठीमागे आई, वडील, दोन भाऊ, भावजयी, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा समर्थ, मुलगी जान्हवी असा मोठा परिवार आहे. तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. महसुलतर्फे पंचनामा करण्यात येत आहे.

Web Title: young farmer suicide hanging by tree