तरीही 'ती' दहा दिवस बहिणीच्या मृतदेहाजवळ बसून राहायची...

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

गेल्या दहा दिवसांपासून मृत झालेल्या आपल्या सख्ख्या बहिणीला जागे करण्याचा प्रयत्न करीत असताना, शेवटी मृतदेह कुजल्याने शेजारील नागरिकांना घाण वास येऊ लागला. या घटनेची चौकशी केली असता, भगूर येथील पंचमोती सोसायटीत राहत असलेल्या दोन मनोरुग्ण बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे, बहिणीचा मृत्यू दहा दिवसांपूर्वीच झाला होता. दुसरी बहिणी दहा दिवसांपासून आपल्या मृत बहिणीकडे एकटक बघत तिला जागे करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. 

नाशिक - गेल्या दहा दिवसांपासून मृत झालेल्या आपल्या सख्ख्या बहिणीला जागे करण्याचा प्रयत्न करीत असताना, शेवटी मृतदेह कुजल्याने शेजारील नागरिकांना घाण वास येऊ लागला. या घटनेची चौकशी केली असता, भगूर येथील पंचमोती सोसायटीत राहत असलेल्या दोन मनोरुग्ण बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. विशेष म्हणजे, बहिणीचा मृत्यू दहा दिवसांपूर्वीच झाला होता. दुसरी बहिणी दहा दिवसांपासून आपल्या मृत बहिणीकडे एकटक बघत तिला जागे करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली. 

भगूर : हेच ते घर..ज्या ठिकाणी मनोरुग्ण बहिणीचा मृत्यू झाला

मनोरुग्ण बहिणीची ह्रदयद्रावक आपबिती
कविता डिगंबर बागूल (वय 44) व मीना डिगंबर बागूल (42) या दोन्ही मनोरुग्ण बहिणी एकट्याच भगूर येथील पंचमोती सोसायटीत वास्तव्यास होत्या. त्यांचे आई-वडील मरण पावल्याने त्या एकट्याच राहत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 21 ऑक्‍टोबरला यातील कविताचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. आपली बहिणी झोपली आहे, या भ्रमात असलेली मीनादेखील गेल्या दहा दिवसांपासून मृतावस्थेतील आपल्या बहिणीच्या शेजारी तिच्याकडे एकटक बघत बसून होती. शेवटी दहा दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने तो कुजू लागला. त्यामुळे गुरुवारी (ता. 31) सोसायटीत घाण वास येऊ लागला. हा वास कोठून येतोय याची चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ या दोघींचे नातेवाईक रवींद्र रमेश खरोटे (रा. सद्‌गुरुनगर, आडकेनगर) यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Younger sister after the death of her sister Sitting near the death body