मारहाणीत युवकाचा मृत्यु  ; पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

नाशिक : बारमध्ये ज्या मित्रांसमवेत मद्यप्राशन केले, त्याच मित्रांनी नंतर हर्षल सांळुखे यास महादेववाडी परिसरात नेऊन बेदम मारहाण केली आणि त्याच चौघा संशयितांपैकी एकाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी हर्षलचा आज सकाळी (ता.21) उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून याप्रकरणी चौघांविरोधात सातपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयितांनी हर्षलला मारहाण केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असले तरी जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत हर्षल याचा कालिका मंदिरसमोर अपघात झाल्याची नोंद करीत पोलिसांची दिशाभूल केल्याचेही पोलिस तपासातून समोर आले आहे.

 मृत हर्षल साळुंखे हा बजरंग दलाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याने, जिल्हा रुग्णालयात कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत, कार्यकर्त्यांना पोलीसांकडून केल्या जात असलेल्या कारवाईची माहिती दिल्यानंतर वातावरण निवळले. 

मृणाल घोडके (रा. तपोवन चौफुली, द्वारका) यांनी सातपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित प्रमोद डांगरे, सुनील गांगुर्डे, सुधीर भालेराव, मुकेश मगर या चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
हर्षल वसंत साळुंखे (रा. इंदिरानगर) हा गेल्या गुरुवारी (ता.18) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सातपूर परिसरातील कुणाल बारमध्ये मद्यप्राशन करीत बसला होता. मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास मृणाल घोडके याने त्यास फोन केला असता, हर्षल याने चौघं संशयितांसोबत मद्यप्राशन करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर चौघांनी हर्षल यास सातपूरच्या महादेववाडी परिसरात नेले आणि चौघांनी त्यास बेदम मारहाण केली. त्यानंतर प्रमोद डांगरे याने हर्षल यास शुक्रवारी पहाटे (ता.19) जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीमध्ये संशयित डांगरे याने, हर्षल हा कालिका मंदिरसमोर जखमी अवस्थेमध्ये सापडल्याचे सांगत त्यास दुचाकीवरून (एमएच 15 इव्ही 7845) आणल्याची नोंद केली होती. शुक्रवारी (ता.19) सकाळी मृणाल घोडकेने हर्षल यास जिल्हा रुग्णालयात दाखल असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर संशयित डांगरे यास फोनवरून संपर्क साधल्यानंतर त्याने हर्षल आणि चौघांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, गंभीर जखमी हर्षल याचा आज (ता.21) सकाळी उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे करीत आहेत.
मृणाल घोडके याने पहिल्यांदा फोन केला त्यावेळी हर्षल संशयितांसोबत दारू पित असल्याचे समजले. परंतु त्यानंतर हर्षल याने मृणाल यास फोन करून संशयित मारहाण करीत असल्याचे सांगत तो मदतीला बोलवत होता. मात्र मृणाल याने संशयित हे हर्षलचे मित्र असल्याने त्याकडे दूर्लक्ष केले. जर, मृणाल त्याचवेळी मदतीला गेला असता तर कदाचित हर्षलचा जीव वाचला असता.  

संशयित प्रमोद डांगरे याने हर्षल यास जिल्हा रुग्णालयात दाखल करताना स्वत:चे नाव न सांगता चुकीची नोंद केली. त्यामुळे मुंबई नाका पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असता त्यांच्या हाती काहीच लागले नाही. परंतु जेव्हा मृणाल याने पोलिसांना माहिती दिली असता, पोलिसांनी कुणाल बारमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा चौघ संशयितांनीच त्यास बारमधून नेल्याचे स्पष्ट झाले. तसेच, त्याचा मोबाईल व दुचाकी सातपूरच्या महादेववाडी परिसरात सापडली

Web Title: youngster death ; Trying to mislead the police