पाथरीच्या तरुणाची नैराश्‍यातून आत्महत्त्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

जळगाव - पाथरी (ता. जळगाव) येथील नवल संतोष चौधरी (वय 25) याने कौटुंबिक कारणातून आलेल्या नैराश्‍यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात दाखल मृतदेहाचे सकाळी विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 

पाथरी येथील शेतमजूर नवल चौधरी काल सायंकाळी नेहमीप्रमाणे घरी आला. यावेळी त्याची आई घरात होती. त्यानंतर त्याने राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री उघडकीस आल्यानंतर त्याला तत्काळ खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे तपासणीअंती मृत घोषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खबरीवरून औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गावकरी आणि मृत तरुणाच्या परिचित मित्रमंडळींनी दिलेल्या माहितीनुसार नवल चौधरी गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणाने प्रचंड नैराश्‍यात होता. त्यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेतला असावा. नवल चौधरींमागे आई, लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे. 

Web Title: Youth commits suicide

टॅग्स